Mahesh Landge
Mahesh Landge Sarkarnama
पुणे

महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रावर 'काळरात्र' आणली...

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : मागणीपेक्षा पुरवठा तथा निर्मिती कमी असल्याने सध्या राज्यात विजेचे भारनियमन सुरु आहे. त्यातून ग्रामीण भागात दररोज काही तास अंधार असतो. शहरातही विजेचा खेळखंडोबा सुरुच आहे. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड (Pimori-Chinchwad) त्याला अपवाद नाही. परिणामी कोट्यवधींचे नुकसान लघुउद्योगांना सोसावे लागत आहे. त्याला सर्वस्वी महाआघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) जबाबदार असल्याची टीका भाजपचे (BJP) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी केली. भारनियमनाविरोधात शहर भाजपने काल (ता.२४ एप्रिल) रात्री महावितरणच्या (Mahavitaran) कार्यालयावर कंदील मोर्चा काढला. त्यावेळी आमदार लांडगे बोलत होते.

गेल्या दोन वर्षापासून अघोषित भारनियमनाचा त्रास सुरूच आहे. उन्हाळ्याच्या तडाख्यात ते अधिकच गडद झाले आहे. कोणतीही सूचना न देता वीज आठ ते दहा तास औद्योगिक पट्ट्यामध्ये गायब असते. अशावेळी उद्योजकांनी करायचे काय, अशी विचारणा आमदार लांडगे यांनी केली. महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोनानंतर ते आधीच खचले असताना त्यात आता लोडशेडिंगचे दुखणे त्यांच्यामागे सुरू झाले आहे. यातून उभारी कशी घ्यावी असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. नागरिकांना देखील याची मोठ्या प्रमाणात झळ बसत आहे. मुलांच्या परीक्षा सुरू आहेत अशावेळी वीज गायब असते. मग, परीक्षा कशा द्याव्या, अभ्यास कधी करावा, पुरेशी झोप कशी घ्यावी, असा देखील प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. एक प्रकारे विद्यार्थ्यांचे, व्यापाऱ्यांचे नुकसान करून महाविकास आघाडी सरकार देशाचे भविष्य आणि वर्तमान दोन्ही खराब करत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

आघाडी सरकारचे करायचं काय खाली डोके वर पाय... उषःकाल होता होता, काळ रात्र आली, ही काळरात्र महाआघाडी सरकारने आणली... अशा घोषणा कंदील मोर्च्यात देण्यात येत होत्या. पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, अनुराधा गोरखे, तसेच अजय पाताडे, दिनेश यादव, आशा काळे, वीणा सोनवलकर, संकेत चोंधे, नंदू भोगले आदी त्यात सामील झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT