Pimpri Chinchwad News : नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी आता राज्यातील 29 महापालिका निवडणुका मिशनवर फोकस केला आहे. यातच आता पुणे अन् पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप शिवसेना युतीत लढणार असल्याचं स्पष्ट करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बाहेरचा रस्ता दाखवला होता. यानंतर काही दिवसांतच भाजपनं पुण्यात 'ऑपरेशन लोटस' राबवत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्काही दिला होता. अशातच आता पिंपरी चिंचवडमधूनही अजितदादांच्या विश्वासू आमदाराचंच घर फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विधानसभेनंतर नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीतह राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडून विरोधी पक्षांसह सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांवरही पक्षप्रवेशासाठी जाळं टाकण्यात येत आहे. याचदरम्यान,विधानसभा उपाध्यक्ष आणि पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांच्या चिरंजीवांनाच पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याबाबतची जाहीर कबुली सिद्धार्थ बनसोडे यांनीच दिली आहे.
सिध्दार्थ बनसोडे म्हणाले,माझ्या वडिलांचे सर्वच राजकीय पक्षांमध्ये मित्र आहेत.त्यामुळे मला भाजपसह इतर पक्षांकडून विचारणा झाली होती.मात्र, अजितदादांनी माझ्या वडिलांवर विश्वास टाकला असल्यानं आपण राष्ट्रवादीतच राहणार आहोत अशी भूमिका स्पष्ट करत सिध्दार्थ बनसोडे यांनी भाजपसह इतर राजकीय पक्षांची ऑफर धुडकावली.
यावर आता विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवारांचे विश्वासू आमदार अण्णा बनसोडे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.ते म्हणाले, मुलाला अशी कोणतीही विचारणा झालेली नाही.पण सिध्दार्थनं प्रभाग 9 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण उमेदवारी कोणाला द्यायची आणि कोणाला नाही, याचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांवर असणार असल्याचंही आमदार बनसोडे यांनी म्हटलं आहे.
अण्णा बनसोडे म्हणाले, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) हे आहेत.कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला नाही, हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. ज्यांनी मुलाखत दिली,त्यांना अजून निर्णय कळालेला नाही. कोणत्याही महिलांचा अपमान झालेला नाही. मी आतमध्ये होतो आणि सर्व घडामोडी आपण पाहिल्या असल्याचाही दावा आमदार अण्णा बनसोडे यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.