मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर आता एकनाथ शिंदे आणि भाजपच्या समर्थकांमध्ये पोस्टरबाजी रंगली आहे. मुंबईत काल अनेक ठिकाणी विशेषत:ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे पोस्टर झळकले आहेत. त्यानंतर आता पुण्यात (Pune) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे पोस्टर भाजप कार्यकर्त्यांनी लावले आहेत. (Devendra Fadnavis latest news)
पुण्यात "मी पुन्हा येईल" असे म्हणणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर लागले आहेत. त्या पोस्टरच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याचे साकडे विठ्ठलाला घालण्यात आले आहे. सोबतच पोस्टरवर देवेंद्र आणि अमृता फडणवीस यांचा एक जुना फोटो देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.
पुण्यातील देवेंद्र फडणवीसांच्या पोस्टरवर लिहिलं आहे की, " फडणवीस मुख्यमंत्री होवो," "हे माऊली तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहू दे तुझ्या पंढरपुरच्या पूजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे" असा मजकूर त्या पोस्टरमध्ये लिहिण्यात आला आहे.
"लोकांचा लोकनाथ एकनाथ, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आत्मसात करणारे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण पुढे घेऊन जाणारे एकनाथ शिंदे यांना मनापासून शुभेच्छा... साहेब आगे बढो, हम आपके साथ है!" असे या एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील पोस्टरवर लिहिलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.