पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर विखारी टीका करणारी कविता अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने शेअर केली होती. त्यावरुन राजकारण तापलं असतानाच भाजपचे (BJP) प्रवक्ते विनायक आंबेकर (Vinayak Ambekar) यांनीही पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यामुळं त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. याला आता आंबेकर यांनी प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडेंवर गंभीर आरोप केले आहेत.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या बालगंधर्व रंगमंदिरात नुकताच कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी महिलांवर हात उगारल्यास हात तोडू, असा जाहीर इशारा दिला होता. यावर आंबेकरांनी आता राष्ट्रवादीला उत्तर दिले आहे. तुमचेच हात भ्रष्टाचाराने एवढे बरबटले आहेत की, तुमचेच हात तुटतील आमचे नाही, असे आंबेकरांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी 25 कार्यकर्ते पाठवून मला मारहाण केली, असा आरोप आंबेकरांनी केला. ते म्हणाले की, अंकुश काकडे हे समन्वयाचे राजकारण करत असल्याचं दाखवतात. पण प्रत्यक्षात मारहाण करायला माणसं पाठवतात. शरद पवार, सुप्रिया सुळेंना जो हक्क आहे तो मलाही आहे. कारण मीही कर भरतो. राष्ट्रवादीचे नेते हे महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल बोलतात पण तसे वागत नाहीत.
आंबेकर यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट केली होती. त्यामुळे आंबेकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. त्यामुळे केतकी चितळेवरचा राग आंबेकरांवर निघाला असल्याची चर्चा रंगली होती. वादग्रस्त पोस्टमध्ये आंबेकरांनी म्हटले होते की, माझी पण कविता. भांडणे लावून थकलो तरी समाधान नाही, मी प्रदीर्घ पदावरी होतो काही करु शकलो नाही. मी फक्त नारद कळीचा कोणी बाप म्हणत नाही. मी बाप म्हणतो स्वतःला कारण मनी समाधान नाही. माझा पुतण्या अन् नातू माझेच ऐकत नाही. तो देव साल्यानो तुमचा मला नेत पण नाही.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांना मारहान केल्यानंतर अंकुश काकडे (Ankush Kakade) यांनी त्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले होते. शाब्बास, कसब्यातील राष्ट्रवादीच्या मावळ्यांनो, आंबेकर यांनी पवार साहेबांवर फेसबुक वर गलिच्छ पोस्ट केली होती, असे काकडेंनी म्हटलं होतं. याचबरोबर आंबेकरांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात अंकुश काकडे, मृणाल वाणी, गणेश नलवडे यांनी रीतसर तक्रार केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.