Crime Pune Sarkarnama
पुणे

लाचखोरी प्रकरणात भाजपाचा राज्यस्तरीय पदाधिकारी अटकेत

भुजबळ हे भाजपाचे पुणे जिल्ह्यातील जुने कार्यकर्ते आहेत.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : संस्थेतल्या कर्मचाऱ्याची नोकरी टिकून राहावी तसेच त्यास भविष्यात सेवा निवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी अडीच लाख रूपयांची लाच स्वीकारताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव भुजबळ यांना अटक करण्यात आली न्यायालयाने त्यांना येत्या शनिवारपर्यंत (ता.१६) पोलीस कोठडी सुनावली आहे.

भुजबळ हे भाजपाचे पुणे जिल्ह्यातील जुने कार्यकर्ते आहेत.यापूर्वी त्यांनी जिल्यात सरचिटणीस म्हणून काम केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालय या नावाने शाळा आहे.भुजबळ यांच्या पत्नी मंगल शिवाजीराव भुजबळ या संस्थेच्या अध्यक्ष आहेत.

तक्रारदार यांचे वडील भुजबळ यांच्या संस्थेत शिपाई म्हणून काम करीत आहेत. मात्र, ते आजारी असतात.आजारपणामुळे नोकरी जाऊ नये तसेच सेवा निवृत्तीनंतर सेवा निवृत्तीचा लाभ मिळत राहावा यासाठी तक्रारदार यांच्याकडे साडेतीन लाख रूपयांची मागणी करण्यात आली.तडजोडीवर अडीच लाख रूपये देण्याचे ठरले.

तक्रारदारांनी या संदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. अडीच लाख रूपये घेताना संस्थेच्या अध्यक्ष मंगल भुजबळ, लेखनिक संदीप रंगनाथ गायकवाड व शिवाजीराव भुजबळ यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयात सादर केले. न्यायालयाने तिघांना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT