Dr. Narendra Dabholkar  Sarkarnama
पुणे

Narendra Dabholkar हत्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाची देखरेख आवश्यक; कुटुंबियांची विनंती

Dr. Dabholkar murder case : हायकोर्टाने सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले

सरकारनामा ब्यूरो

Dr. Dabholkar murder case : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाची देखरेख आवश्यक आहे, अशी विनंती दाभोळकर कुटुंबियांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे. तसेच आरोपींची याचिका फेटाळून लावण्याची मागणी देखील हायकोर्टाकडे दाभोळकर कुटुंबियांनी केली आहे.

याप्रकरणी आरोपपत्र दाखल होऊन पुणे सत्र न्यायालयात खटला देखील सुरू झाला आहे. त्यामुळे कायद्यानुसार आता मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर देखरेख ठेवण्याची गरज नाही, अशी मागणी करत या प्रकरणातील दोन आरोपींनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

त्यांच्या या मागणीवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टाने दाभोलकर कुटुंबीयांना दिले होते. त्यांनी यास विरोध केल्याने हायकोर्टाने सीबीआयच्या नव्या तपासअधिकाऱ्यांना याबाबत आपली भूमिका तीन आठवड्यांत स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच तो पर्यंत या प्रकरणाची सुनावणी ३० जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास करणारे सीबीआय अधिकारी ३१ डिसेंबरला निवृत्त झाल्याने त्यांच्याजागी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणावर न्या.अजय गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी पार पडली.

याप्रकरणी अद्याप काही आरोपी फरार असून हत्येसाठी वापरण्यात आलेले हत्यार, मोटार सायकल अजूनही सापडलेल्या नाहीत. हत्येमागचे कारण आणि मुख्य सूत्रधाराचा शोध लागलेला नाही, त्यामुळे याप्रकरणावर न्यायालयाची देखरेख आवश्यकच असल्याचे उत्तर दाखल करताना दाभोलकर कुटुंबियांचे वकील अभय नेवगी यांनी खंडपीठाला सांगितले.

तसेच आरोपींच्या याचिकेला विरोध केला. त्यामुळे तपास अधिकाऱ्याला आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी वेळ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. त्यावर तपास अधिकाऱ्याला तीन आठवड्यांची मुदत देऊन खंडपीठाने सुनावणी ३० जानेवारी रोजी निश्चित केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT