Bribery sarkarnama
पुणे

Revenue Department News : महसूल खात्यातील लाचखोरी कायम; सहा दिवसांत तलाठी, मंडलाधिकाऱ्यास अटक!

सरकारनामा ब्यूरो

Revenue Department and Bribery : मागीलवर्षी राज्यात लाचखोरीत पहिल्या क्रमाकांवर राहिलेल्या महसूल विभागाची ही कामगिरी तथा घौडदौड यावर्षीही पुढे तशीच सुरु आहे.एकट्या पुणे जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांत या विभागाचे दोन कर्मचारी लाच घेताना पकडले गेले.त्यामुळे हा विभाग यावर्षीच्या पहिल्या तिमाहीतच लाचखोरीत अव्वल आला आहे.

12 मार्चला थेऊरच्या (ता.हवेली,जि.पुणे) मंडलाधिकारी (सर्कल) जयश्री कवडे यांच्यासह योगेश कांताराम तातळे (वय 22,खासगी संगणक ऑपरेटर) आणि विजय सुदाम नाईकनवरे (वय 33, एजंट तथा खासगी व्यक्ती)यांना थेऊर सर्कल कार्यालयाच्या आवारातच सात हजाराची लाच घेताना पकडण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सातबाऱ्यावर कमी झालेले नाव लावण्यासाठी त्यांनी ही लाच घेतली होती.त्यानंतर सहा दिवसांत महसूल विभागातील दुसरा लाचेचा ट्रॅप सोमवारी मावळ तालुक्यात झाला.त्यात सखाराम कुशाबा दगडे (वय 52) हा करुज, सज्जाचा तलाठी 25 हजार रुपयांची लाच घेताना पकडला गेला. वडगावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर त्याने ही लाच घेतली.

वडगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतीची फोड (वाटणी) करण्यात आली होती. त्याची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी दगडे याने 50 हजार रुपयांची लाच या शेतकऱ्याकडे मागितली होती. त्याचा पहिला 25 हजाराचा हफ्ता घेताना त्याला पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध वडगाव मावळ पोलिस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे पीआय वीरनाथ माने पुढील तपास करीत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT