<div class="paragraphs"><p>Shivajirao&nbsp;Adhalrao patil</p></div>

Shivajirao Adhalrao patil

 

sarkarnama

पुणे

आढळराव म्हणतात, बैलगाडा शर्यत तर होणारच : स्थगितीची अफवा हे विरोधकांचे उद्योग!

डी. के. वळसे पाटील

मंचर (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे शनिवारी (ता. १ जानेवारी) सकाळी सात वाजता बैलगाडा शर्यत (Bullock cart race) होणारच आहे. माझ्या काही विरोधकांनी बैलगाडा शर्यत रद्द करण्यात आल्याच्या खोट्या अफवा पसरविण्यास सुरुवात केली आहे. गेली १५ वर्षे या लोकांनी हेच उद्योग थाटले केले आहेत. अफवांवर विश्वास न ठेवता बैलगाडा मालकांनी बैलगाडे घेऊन यावेत,” असे आवाहन शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao patil) यांनी केले आहे. (Bullock cart race will be held at Landewadi : Shivajirao Adhalrao)

सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यात बैलगाडा शर्यती भरविण्यास परवानगी दिल्यानंतर माजी खासदार आढळराव पाटील यांनी पुढे येऊन शर्यत भरविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी येत्या १ जानेवारी रोजी म्हणजे उद्या शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात उलटसुलट चर्चा असताना आढळराव पाटील यांनी त्यावर बैलगाडा शर्यती होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

शिवसेना उपनेते आढळराव पाटील म्हणाले की, “बैलगाडा शर्यती स्थगित करण्याबद्दल पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप कुठलेही आदेश आलेले नाहीत. सर्वांनी कोरोनाचे नियम पाळून बैलगाडा शर्यती पार पडण्यासाठी प्रशासनाला व गावकऱ्यांना सहकार्य करावे. बैलगाडा शर्यतीत सहभागी होण्यासाठी ७०३ बैलगाडा मालकांनी नाव नोंदणी केली होती. लॉटरी पद्धतीने निवड झालेले २५१ बैलगाडे शर्यतीत धावणार आहेत.”

दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख अरुण गिरे, सरपंच अंकुश लांडे पाटील, शिवसेनेचे युवा नेते सचिन बांगर व ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता. ३१ डिसेंबर) बैलगाडा शर्यतीच्या घाटाची पाहणी केली. घाटाच्या दोन्ही बाजूनी साउंड सिस्टीमला ५१ स्पीकर (भोंगे) बसविण्यात आली आहेत. पंच कमिटी गावाने जाहीर केली आहे. बैलगाडा शर्यतीमुळे गावात जल्लोषाचे वातावरण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT