Mukta Tilak - Kasba Assembly Sarkarnama
पुणे

Kasba Assembly By-Election : कसब्यात तीन दशकांनंतर इतिहास घडणार का? बापटांचा झाला होता पराभव...

Kasba Assembly By-Election News : पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघामध्ये पोटनिवडणूक होणार आहे

सरकारनामा ब्यूरो

Kasba Assembly News : निवडणूक आयोगाने राज्यातील दोन विधानसभेच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघ आणि पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड मतदार संघासाठी निवडणूक होणार आहे.

कसबा विधानसभा मतदारस संघावर अनेक वर्ष भाजपचे वर्चस्व आहे. मात्र, तरीही पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसला संधी मिळाली होती. १९९१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला येथे संधी मिळाली होती. काँग्रेसच्या (Congress) वसंत थोरात यांनी भाजपचे गिरीष बापट यांचा परवाभव केला होता. त्यामुळे आता या पराभवाची पुनरावृत्ती होणार का, अशी चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघ अनेक वर्ष भाजपच्या (BJP) ताब्यात आहे. गिरीष बापट येथून पाच वेळा भाजपचे आमदार होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते पुण्याचे खासदार झाले. त्यामुळे येथे मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांना संधी मिळाली होती. मात्र, बापट यांच्या आधी अण्णा जोशी व त्यांच्याआधी अरविंद लेले यांनी येथून निवडणूक जिंकली होती. मात्र, अण्ण जोशी हे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पोटनिवडणूक झाली होती. त्यामध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता.

पोटनिवडणुकीत काँग्रेसने माजी महापौर थोरात यांना संधी दिली होती. तर भाजपने बापट यांना संधी दिली. त्यामध्ये थोरात यांनी बाजी मारली होती. आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार का, अशी चर्चा सुरु आहे. मात्र, दोन्ही निवडणुकींची परिस्थिती वेगळी आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना ७५ हजार ४९२ मते मिळाली होती. तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. त्यांना ४७ हजार २९६ मते मिळाली होती. या मतदार संघात एकून १८ नगरसेवक आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT