Rupali Chakankar
Rupali Chakankar Sarkarnama
पुणे

चाकणकरांचा राजीनामा होऊन महिना उलटला; पुढे काय ?

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा रूपाली चाकणकर (Rupali chakankar) यांचा गेल्या महिन्यात तडकाफडकी राजीनामा घेण्यात आला. मात्र, चाकणकर यांनी राजीनामा देऊन महिना उलटला तरी पक्षाच्या महिला आघाडीला नव्या प्रदेशाध्यक्ष मिळालेल्या नाहीत.

महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या चाकणकर यांच्याकडे सुमारे पाच-सहा महिन्यापूर्वी महिला आयोगाचे अध्यक्षपद सोपविण्यात आले. त्यानंतर ही दोन्ही पदे त्यांच्याकडेच होती. कोणतीही चर्चा नसताना गेल्या महिन्यात अचानकपणे चाकणकर यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी नव्या प्रदेशाध्यक्षांची नेमणूक लगेच केली जाणार असल्याचे त्यावेळी पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले होते. नवी नेमणूक करण्यात येणार असल्यानेच चाकणकर यांचा राजीनामा झाला होता. मात्र. त्यानंतर काहीच न झाल्याने नवी नेमणूक झालेली नाही.

अद्याप नेमणूक झाली नसली तरी चाकणकर यांच्या जागी बीडमधून दोन नावांची चर्चा या पदासाठी झाली आहे. रेखा फड आणि हेमा पिंपळे ही ती दोन नावे आहेत. फड या पूर्वी मनसेत बीड महिला जिल्हाप्रमुख पदी कार्यरत होत्या. गेली दहा वर्षांपासून त्या राष्ट्रवादीत कार्यकरत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षपद देखील भूषविले आहे. लक्षवेधी आंदोलनामुळे त्या राज्यात चर्चित आहेत. त्यांच्या मागे महिलांचे मोठे संघटन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये आक्रमक भूमिका घेतलेली आहे.

नुकत्याच झालेल्या हिजाब समर्थनार्थ मोर्चात नेतृत्व करणाऱ्या बीडच्या हेमा पिंगळे यादेखील प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेत आहेत. वकील असलेल्या हेमा पिंगळे या २० वर्षांपासून बीडच्या राजकारणात सक्रिय आहेत. हेमा पिंगळे यांनी शिवसेनेत नऊ वर्षे काम केले होते. त्यावेळीही त्यांनी महिला आघाडी जिल्हाप्रमुख म्हणून काम करताना महागाईविरोधात आंदोलन केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT