Chandrakant Patil |Uddhav Thackeray |Prakash Ambedkar
Chandrakant Patil |Uddhav Thackeray |Prakash Ambedkar Sarkarnama
पुणे

Chandrakant Patil : "एकत्र येणं आणि भ्रमनिरास होणं हा इतिहास" : पाटलांनी ठाकरे-आंबेडकरांना डिवचलं!

सरकारनामा ब्युरो

Chandrakant Patil : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लहान वयात विश्वासार्हता मिळवली, त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, ते माहिती नसताना काही बोलत नाहीत. माझ्या सारख्या लोकांनी त्यांच्याकडून धडा शिकला पाहिजे. मी काहीतरी बोलतो आणि नंतर दिलगिरी व्यक्त करतो, असे राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ते माध्यमांशी संवाध साधत होते.

शिवसेना ठाकरे गट आणि वंचितच्या युतीबाबत भाष्य करताना पाटील म्हणाले, त्यांची युती किती काळ टिकेल, हा येणारा काळच ठरवेल. याचा दोघांना फायद होईल की त्याचा तोटा, पुढील काळात स्पष्ट होईल. किती काळ ते एकत्र राहणार? एकत्र येणं आणि भ्रमनिरास होणं हा इतिहास आहे, असे म्हणात त्यांनी ठाकरे आणि आंबेडकरांना डिवचले आहे.

पुण्यातील कोय़ता गँगबाबत प्रश्न विचारले असती ते म्हणाले, "कोयता गँग कडून जो उपद्रव सुरू आहे. त्याबाबत ८-९ टोळींना पकडून मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरु आहे. अशा घटना घडतात. कारवाई करायची असते. कोयता प्रकरण नवीन आहे. इजी मनी लालसा यामुळे कोयता गॅंग वाढतेय. पुणे पोलिस कारवाई करत आहेत, असे पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांनी केलेल्या पहाटेच्या शपथविधीच्या वक्तव्याबाबत बाबत ते म्हणाले, "असे गोप्यस्फोट त्यावेळी का करत नाहीत. उशीरा आलेलं शहाणपण काही कामाचं नाही. तसेच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या उमेदवारीबाबत ते म्हणाले, "आमच्या कार्यपद्धती प्रमाणे संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी तयार झाली आहे. ती केंद्राकडे उद्या पाठवू, ३१ किंवा १ तारखेला या यादीवर चर्चा होईल आणि दिल्लीतून नावे घोषित होतील."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT