Chandrakant Patil
Chandrakant Patil  
पुणे

पालकमंत्री पाटलांच्या पहिल्या पिंपरी दौऱ्यात फक्त अभ्यास, निर्णय नाही, केवळ सुचना

सरकारनामा ब्युरो

पिंपरी : पुणे जिल्ह्याचे नव्याने पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटील हे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा समजून घेण्याचा पुन्हा प्रयत्न करीत आहेत.त्याअंतर्गत त्यांनी शुक्रवारी (२१ ऑक्टोबर) पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय यांना भेट देऊन आढावा घेतला. अभ्यास केला. मात्र,ठोस निर्णय घेतला नाही, केवळ सूचना केल्या. त्यावर काही समजून न घेता हवेत गोळ्या मारण्याचा माझा स्वभाव नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, पालकमंत्र्यांच्या पोलिस आयुक्तालयातील आढावा बैठकीत भाजपचे पदाधिकारीही सहभागी झाल्याने त्याची मोठी चर्चा झाली. तर, दुसऱ्यांदा पालकमंत्री होऊनही पाटील यांनी या आढावा बैठकांतून फक्त अभ्यास केला, निर्णय मात्र घेतले नाहीत.फक्त काही सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला केल्या. त्यांच्या शहर दौऱ्याची सुरवात पिंपरी पालिका मुख्यालयातील बैठकीपासून झाली. त्याला शहर कारभारी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे, विधानपरिषद सदस्या उमा खापरे, चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रतिनिधी व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर माई ढोरे,माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके आदी उपस्थित होते.

नंतर पोलिस आयुक्तालयातील आढावा बैठकीतही हे भाजप पदाधिकारी सामील झाल्याने त्याची चर्चा झाली. त्यांच्या उपस्थितीबाबत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. तर,ही क्राईमची बैठक नसल्याने तिच्या उपस्थितीवर बंधन नव्हते, असा खुलासा एका पोलिस उपायुक्तांनी केला.पोलिस आय़ुक्तालय आढाव्यानंतर त्यांनी पीएमआरडीए कार्यालयात जाऊन तेथील आढावा घेतला. अशा आढावा बैठका दर महिन्याला घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.तर, निर्णय घेण्यासाठी दिवाळीनंतर पुन्हा शहर दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे हिंजवडी व तळवडे आयटीपार्क असलेल्या पिंपरी पोलिस आयुक्तालयात सायबर पोलिस ठाणे सुरु करण्याची पालकमंत्र्यांनी पोलिस आय़ुक्तांना आढावा बैठकीत केली. शहर पोलिस दल आधुनिक करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.राज्य पोलिस दलात होणाऱ्या नव्या भरतीतील दोनशेजण पिंपरीला देण्यात येतील. त्यामुळे या आयुक्तालयातील मनुष्यबळाची अडचण थोडी कमी होईल, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT