Chandrakantdada wears Puneri Pagdi
Chandrakantdada wears Puneri Pagdi  
पुणे

चंद्रकांतदादा पाटीलांनी कोथरूडमध्ये घातली पुणेरी पगडी !

सरकारनामा

पुणे : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय महायुतीचे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार  चंद्रकांतदादा पाटील यांचे बुधवारी कोथरूडकरांनी जोरदार  स्वागत केले.

कोथरुडकरांच्या पुणेरी पगडीचा चंद्रकांतदादांनी स्वीकार करून डोक्यावर चढवली . चंद्रकांत दादांनी पुणेरी संस्कृतीचे  प्रतिक असलेली पगडी घालून गेले दोन दिवस त्यांच्याविरुद्ध सुरु असलेल्या नकारात्मक प्रचाराला उत्तर दिले असे मानले जाते .

पुण्यामध्ये पगडीवरून गेल्या काही वर्षात वाद प्रवाद सुरु असताना चंद्रकांतदादांनी कोथरूडच्या मतदारांशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला असे मानले जात आहे . 

विविध घटकांमधील सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधून दादा पाटील यांनी आपली कोथरूडकर जनतेशी नाळ घट्ट आहे याची प्रचिती दिली. नागरिकांनीदेखील दादा पाटील यांचे  स्वागत केले.

तत्पूर्वी दादा पाटील यांनी मोतीबागेत भेट दिली. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकारी वर्गाशी चर्चा केली.

त्याचप्रमाणे चंद्रकांत दादा पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महासंपर्क अभियानाअंतर्गत कोथरूडमधील विविध क्षेत्रांमधील प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद साधला. 

पंडित शौनक अभिषेक, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, सिने दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे,  संघाचे महानगर संघचालक डॉ. रवींद्र वंजारवाडकर आदींचा यामध्ये समावेश होता. चंद्रकांत दादा पाटील उद्या गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT