पुणे : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांना (Hasan Mushrif) भारतीय जनता पक्षाकडून कोणतीही ऑफर नव्हती. जर एखाद्याला ऑफर दिली आणि त्यांने ती नाकारली तर ती मेरिटवर नाकारली जाते, मुश्रीफ ड्रामा करत असून त्यांनी तो बंद करावा, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. चंद्रकात पाटील यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण मी ती नाकारल्यानंतरच माझ्यावर आयकर विभागाच्या धाडी सुरू झाल्या, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यावरही चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
कोल्हापूरात (Kolahpur) भाजप भुईसपाट झाला आहे. आता कोल्हापूरात राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांमुळे भाजपा भुईसपाट झाली. त्यामुळे त्यांनी मला भाजपात येण्याची ऑफर दिली. पण मीही त्यांना भाजपात येणार नसल्याचं सांगितलं. त्यानंतरच त्यांनी माझ्यावर आयकर विभागाची धाड टाकली. राज्यात महाविकास आघाडी सरकार मजबूत झाले आहे. त्यात भाजपाला यश मिळत नसल्याने त्यांचे हे प्रकार सुरु आहेत, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.
''एखाद्याला ऑफर दिली आणि त्याने ती नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात. आता मुश्रीफ यांच्यावर कारवाई होत असल्याने आणि त्यांचे घोटाळे बाहेर पडत असल्याने मुश्रीफ नाटक करत आहे. असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुश्रीफ यांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे. हसन मुश्रीफांना भाजपमध्ये येण्याची कुणी ऑफर दिली, ऑफर लेटर घेऊन आम्ही फिरत नाही. कुणालाही देण्याकरिता आमचे ऑफर मैदानात पडलेले नाहीत,'' अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार मुश्रीफांवर पलटवार केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.