Chandrashekhar Bawankule News Sarkarnama
पुणे

BJP News : 20 मे पूर्वीच होणार भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड; काय असेल वयोमर्यादा? बावनकुळेंनी स्पष्ट सांगितले

Chandrashekhar Bawankule News : भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष, मंडलाध्यक्ष आणि विधानसभा समन्वयकांची नियुक्ती होणार आहे

Amol Jaybhaye

BJP district president News : राज्यातील संघटनात्मक निवडणुकांसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. संघटनेतील पदाधिकाऱ्यांना जिल्हानिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. येत्या २० मे पूर्वी सर्व जिल्हाध्यक्षांची निवड पूर्ण करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

बावनकुळे म्हणाले, ७०५ तालुक्यांच्या मंडलाध्यक्षांच्या नियुक्त्या १० जून पूर्वी तर २८८ विधानसभा मतदारसंघ समन्वयकांची नेमणूक ३० मे पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. या सर्व पदांना वयाचा निकष अगदी तंतोतंत ठरला नसला तरी ३५ ते ५५ या वयोगटातील कार्यकर्त्यांची पदांवर नियुक्ती करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, महापालिका व लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका येत्या दोन वर्षात पूर्ण होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पक्षाकडून मजबूत संघटना बांधणीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. या माध्यमातून जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका होणार आहेत.

दरम्यान, भाजपाने (BJP) नुकतेच राज्याच्या कार्यकारिणीमध्ये बदल केले आहेत. यामध्ये अनेकांना नारळ देत नवीन पदाधिकाऱ्यांना संधी दिली आहे. त्यानंतर आता राज्यभरातील जिल्हाध्यक्ष बदलले जाणार असल्याची चर्चा आहे. जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी भाजपाचे राज्यपदाधिकारी विविध ठिकाणी जाऊन, कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जात आहेत. त्यामुळे लवकरच भाजपा भाकरी फिरवणार आहे.

अगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने आतापासून तयारी सुरु केली आहे. त्याच बरोबर राज्यात 'मिशन 45' ची तयारी सुरु आहे. या अंतर्गत केंद्रीय मंत्री विविध लोकसभा मतदारसंघांचे दौरे करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपाने राज्य पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आता जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

या मध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. सध्या जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरु आहेत. त्यातून नवीन अध्यक्षांची निवड होणार आहे. यामुळे भाजपा राज्यात भाकरी फिरवणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT