Dheeraj Ghate, Murlidhar Mohol News Sarkarnama
पुणे

Pune News : 15 मे पूर्वी पुण्याला मिळणार नवा शहराध्यक्ष; कुणाला मिळणार संधी, घाटे की मोहोळांना?

Pune Bjp News : भाजपाच्या नवीन कार्यकारिणीतून पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांना वगळण्यात आले आहे.

Amol Jaybhaye

State executive of BJP announced News : भारतीय जनता पार्टीची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांना वगळण्यात आले आहे. तर काहींना बढती देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी पक्षाची राज्य कार्यकारिणी जाहीर केली.

यामध्ये पुणे शहर भाजपाचे (BJP) संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांना बढती देण्यात आली आहे. त्यांना प्रदेश उपाध्यक्ष करण्यात आले आहे. राज्य उपाध्यक्ष असलेले माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांना उपाध्यक्षपदावरून पायउतार करत विशेष निमंत्रितांमध्ये संधी देण्यात आली आहे.

विशेष, म्हणजे मागच्या कार्यकारिणीत चिटणीस असलेल्या धीरज घाटे यांना वगळण्यात आल्याने त्यांच्याकडे पुण्याचे शहराध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे. १५ मेपूर्वी नव्या शहराध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे पुणे शहर अध्यक्षपदी कुणाला संधी मिळणार याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

पुण्यातून राजेश पांडे यांना उपाध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे. राज्यपातळीवर संधी देण्यात आल्याने शहराध्यक्षपदाच्या शर्यतीतून ते बाद झाले आहेत. पुण्यातील कसबा पेठ पोटनिवणुकीमध्ये पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. पुणे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार राज्यकार्यकारिणीच्या माध्यमातून पुण्यात काही बदल करण्यात आले आहेत.

कसब्यातील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. कसबा पोटनिवणुकीत काँग्रेसने (Congress) बाजी मारली. रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. त्यामुळे पुण्यातील भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार अशी चर्चा होती. बावनकुळे यांनीच शहाराध्यक्ष बदलणार असल्याचे सांगितल्यामुळे आता संधी कुणाला मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT