Koregaon Bhima : कोरेगावभीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला आहे. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जाणार होते. पण त्यांना धमकीवजा इशारा देण्यात आल्याने ते कोरेगाव भीमा येथे गेले नाहीत. त्यांनी एक पत्र टि्वट करुन याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
'कोणताही अनुचित प्रकार घडू नये व सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून विजय स्तंभाला घरूनच अभिवादन करणार आहे. विजयस्तंभ परिसर विकासासाठी शासनाने घोषित केलेल्या 100 कोटी निधीची अंमलबजावणी करणार आहे, असं चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रात स्पष्ट केलं आहे.
महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकीची घटना घडली होती. डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी ०१ जानेवारी १९२७ रोजी आपल्या अनुयायांसह भीमा कोरेगाव येथे शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभास मानवंदना दिली होती. तेव्हापासून हजारो, लाखो अनुयायी दरवर्षी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येत असतात.
'मी दोनवेळा दिलगिरी व्यक्त केली आहे. पण तरीही माझ्या विधानाचा विपर्यास करून माझ्यावर भ्याडपणे शाईफेक झाली. बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही आंदोलनात अपवादानेही हिंसा नव्हती. आताही मी भीमा कोरेगावला विजयस्तंभाच्या दर्शनाला आणि अभिवादनाला आलो तर शाईफेक करू अशी धमकी दिला आहे.
मी बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी शाईच काय छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार आहे. पण आज भिमा कोरेगावमध्ये लाखो अनुयायी आलेले आहे. अशावेळी कोणतेही गालबोट लागावे, जातीय दंगे व्हावे, अशी काही जणांची इच्छा आहे. पण, लोकांची सुरक्षितता ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या हृदयात आहेत.
आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या हृदयात आहेत, त्यामुळे मी माझ्या घरी आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याना वंदन करून विजयस्तंभास मानवंदना देणार आहे. समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मनसुबा मी पूर्ण होऊ देणार नाही आहे. सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भीमा कोरेगावला उभारलेल्या विजयस्तंभास मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.