Eknath Shinde, Chhagan Bhujbal  Sarkarnama
पुणे

Chhagan Bhujbal: मुख्यमंत्री महायुतीचाच होणार, शिंदे आमचेच!

Maharashtra Politics: मी कुठेही असलो तरी 3 जानेवारीला नायगाव येथे जातोच

Sudesh Mitkar

Pune News: 'देशात सगळीकडे मोदी लाट आहे. पुन्हा तेच पंतप्रधान होतील. राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. एकनाथ शिंदे महायुतीचे मुख्यमंत्री आहेत, म्हणजे शिंदे आमचेच आहेत,' अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी पुण्यात दिली आहे.

मागासवर्गीयांसाठी काम करा. हेच महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांनी सांगितले आहे. त्यामुळे मी कुठेही असलो तरी 3 जानेवारीला नायगाव येथे जातोच हा माझा नित्यनियम आहे. राज्यात जे ओबीसी एल्गार मोर्चे निघत आहेत. त्यामध्ये जो मोर्चा ⁠13 तारखेला बीडला होणार आहे तिथे मी जाणार आहे. बीडला जे घडले त्यामुळे तिथे जाणे आवश्यक आहे. त्यामुळे तिथे सभा घेणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

भुजबळ म्हणाले, "⁠एका बाजुने ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे यासाठी ताकत लावत आहेत. तर दुसरीकडे बाळासाहेब सराटे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. माळी कोळी साळी यांना ओबीसीमधून काढावे यासाठी. म्हणून आम्ही हस्तक्षेप याचिका दाखल केली. त्याबाबत आज सुनावणी आहे.

पंढरपूर येथील ओबीसी एल्गार सभेला जाणार मात्र नांदेड येथील सात तारखेच्या ओबीसी एल्गार सभेला मी जाणार नाही. कारण त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईत महत्त्वाचा कार्यक्रम आहे, असे भुजबळ यांनी सांगितले

सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी जरांगे यांची मागणी आणि अंतरवाली सराटी मध्ये कुणबी नोंदी सापडल्या नाहीत यावर छगन भुजबळ म्हणाले, जरांगे हे आता कुणबी नोंदी मागण्याच्या पुढे गेले आहेत. ते आता सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या असं म्हणत आहेत.

महानंदाकडून त्रुटी...

महानंद डेअरीच्या बाबतीत छगन भुजबळ यांचे मोठं विधान केले आहे. भुजबळ म्हणाले, ज्याच्या नावात महा आहे. अशी संस्था बाहेर जाणं हे मला तरी वैयक्तिक पटलेलं नाही. महानंदाच्या कामात सरकारकडून आणि महानंदाकडून त्रुटी राहिल्याचं दिसत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिरात माझ्या शुभेच्छा असे भुजबळ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT