Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Sarkarnama
पुणे

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : शिवरायांचे किल्ले हे मंदिरापेक्षा मोठे: देवेंद्र फडणवीस

Shivaji Maharaj Birth Anniversary Shivneri Fort Celebrations:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवनेरीवर नतमस्तक होण्यासाठी राज्यातून अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल होत आहेत.

Mangesh Mahale

Pune: छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395वी जयंती आहे. त्यानिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारही उपस्थित होते.

शिवरायांचे किल्ले कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहे. शिवाजी महाराजाच्या सर्व किल्ल्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवनेरीवर नतमस्तक होण्यासाठी राज्यातून अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल होत आहेत. पारंपारिक वेशभूषेत, शिवरायांच्या नावाच्या घोषणा देत शिवभक्तांनी या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास ट्विट करत महाराजांना अभिवादन केलं आहे. त्यांनी लिहिलं, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत, असं मोदींनी म्हटलं आहे.यासोबतच त्यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.

शिवजयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील पोस्ट करतअभिवादन केले आहे. हिंदवी स्वराज्याचा "उद्घोष करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन नीती, कर्तव्य आणि धर्मपरायणता यांचा संगम होते. कट्टरपंथी आक्रमकांच्या विरुद्ध जीवनभर संघर्ष करून सनातन स्वाभिमानाचे धर्म ध्वज रक्षक छत्रपती शिवाजी महाराज एक राष्ट्रनिर्माता म्हणून सदैव स्मरणीय असतील. शिवजयंतीच्या निमित्ताने अद्वितीय साहसाचे प्रतीक, छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी नमन..., असं अमित शाह यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT