Devendra Fadnavis statement on DJ in Maharashtra Sarkarnama
पुणे

Pune DJ : 'डीजे' वादात पुणे भाजप बॅकफुटला? CM फडणवीसांचे मोठे संकेत; कार्यकारिणी बैठकीतून केलं आवाहन

Devendra Fadnavis statement on loud DJ : लवकरच गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे, तत्पूर्वीच पुण्यामध्ये या धार्मिक उत्सवात डीजे वाजवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

Amit Ujagare

Devendra Fadnavis appeal on DJ: महाराष्ट्रात गणेशोत्सवापासून विविध धार्मिक कार्यक्रम, महापुरुषांच्या जयंत्या आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डीजे वाजवण्याविरोधात आता नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. डीजेविरोधातला विरोध दिवसेंदिवस अधिकाधिक वाढताना दिसतो आहे. यापार्श्वभूमीवर जनमत टाळू पुढे जाता येणं शक्य नसल्यानं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील डीजेच्या विरोधात मोठे संकेत दिले आहेत. पुण्यात प्रदेश भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत फडणवीसांनी महत्वाचं आवाहन केलं आहे.

फडणवीस म्हणाले, "सांस्कृतीक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याची क्षमता केवळ पुण्यातच आहे. त्यामुळं माझं पुणेकरांना आवाहन आहे की, डीजेच्या वादात न पडता पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं पाहिजे की, संपूर्ण सांस्कृतीक पद्धतीनं गणेशोत्सव कसा साजरा होतो"

मुख्यमंत्र्यांचं सेफ अपील

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांना अर्थात नागरिकांनाच आवाहन केलं आहे, की डीजेविनाच पारंपारिक पद्धतीनं तुम्ही गणेशोत्सव साजरा करण्याला प्राध्यान्य द्यावं. पण त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना मात्र त्यांनी डीजे वापरावा किंवा वापरु नये याबाबत थेटपणे काहीही संदेश दिलेला नाही.

पोलिसांची भूमिका काय?

पण मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनीच जर पारंपारिक पद्धतीनं उत्सव साजरा करा असं म्हटल्यानं आता पोलीस प्रशासन याकडं कशा पद्धतीनं पाहतंय आणि डीजेबाबत काय कारवाया करत हे पाहाणं महत्वाचं असणार आहे.

पुण्यातील डीजे संबंधित वाद मागील काही दिवसांपासूनच चांगलाच तापला आहे. विद्यानंद बापट यांनी महापालिका सभागृहातील बैठकीदरम्यान सुरु केलेल्या मोहिमेला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. पण पुणे भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह अन्य भाजपचे नेते, पदाधिकारी डीजेसाठी आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आवाहन पुणे भाजपला बॅकफुटवर ढकलणारे असल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT