Cm Eknath Shinde Press News In Aurangabad
Cm Eknath Shinde Press News In Aurangabad Sarkarnama
पुणे

मुख्यमंत्री शिंदेंचा पहिला पुणे दौरा : सेनेला धक्का देणार आणि समर्थकांच्या घरी जाणार...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे (2 ऑगस्ट) मंगळवारी पुणे (Pune) दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे. आतापर्यंत अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहे. त्यामुळे आता त्यांच्या या दौऱ्यात शिवसेनेला (Shivsena) आणखी कोणते धक्के देतात याकडे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे उद्या सकाळी पुण्यात येणार आहेत. पुणे दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. शिंदे यांच्या दौऱ्याची सुरुवात पत्रकार परिषदेने होणार आहे. त्यानंतर ते विभागीय कार्यालयामध्ये विकास कामांचा आढवा घेणार आहेत. तसेच फुरसुंगी पाणी योजना प्रकल्पास भेट, जेजुरीमध्ये ते खंडोबा मंदिराला भेट देऊन दर्शन घेणार आहेत. शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यानिमित्ताने येथे एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यात शिवतारे आणि शिंदे उद्धव ठाकरे यांच्यावर काय तोफ डागतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

त्यानंतर हडपसर येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॅाल मैदानाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या निवास्थानीही ते भेट देणार आहेत. त्यानंतर शिंदे गटाच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ गणेश मंदीर येथे आरती करण्यात येणार आहे. त्या आरतीला शिंदे उपस्थित राहणार आहेत. आमदार अनिल बाबर यांची दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात भेट घेऊन ते ठाण्याकडे रवाना होणार आहेत.

शिंदे यांचा सध्या राज्यभर दौरा सुरु आहे. मालेगाव, औरंगाबाद येथे त्यांचे जोरदार स्वागत झाले. तसेच अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या उपस्थित त्यांच्या गटाला पाठिंबा दिला. या सभांमधून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर ते पुण्यात शिवसेनेला कोणता धक्का देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT