Eknath Shinde
Eknath Shinde  Sarkarnama
पुणे

'पुरंदर विमानतळ दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न आता थांबलाय.. कारण आपण आलोय!'

सरकारनामा ब्यूरो

पुणे : आम्ही जर बंडखोर असतो तर जनतेने समर्थन दिले असते का? आम्ही बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) वाचवण्यासाठी जी भूमिका स्वीकारली आहे, तीला जनतेने मान्याता दिली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी सासवड येथे सभा आयोजित केली होती. त्या सभेमध्ये शिंदे बोलत होते. यावेळी शिंदे म्हणाले, पुरंदर विमानतळ दुसरीकडे न्यायचा कोणीतरी प्रयत्न केला होता. मात्र, आता थांबला आहे कारण आपण आलो आहोत. सरकार स्थापन झाल्यापासून अनेक निर्णय आम्ही घेतले आहेत. आमचा स्वत:चा काही स्वार्थ नाही. शिवतारे यांनी या मतदार संघात खुप कामे केली आहेत. त्यांचा अल्पमतांनी पराभव झाला. कट कारस्थान करुन त्यांचा पराभव करण्यात आला. ते कट कारस्थानी लोक आहेत, आपण सरळ माणस आहोत.

तुमच्या हक्काचा माणूस मंत्रालयात बसला आहे. पंढरपूरमध्ये आम्ही पांडुरंगाची पूजा केली. सगळे रस्ते भरले होते. १५ लाख लोक तिथे उभे होते. मला सांगायला आनंद वाटतो की ते वारकरी, महिला माझ्या गाडीला वाट करून अभिवादन करत होते, आणि म्हणत होते एकनाथ जी काळजी करू नका आम्ही तुमच्या सोहत आहोत.

गेली अडीत वर्ष काय झाले ते जाऊ द्या. हा एकनाथ शिंदे तुमच्या परिवारातील मुलगा, भाऊ आहे. मी आपल्याला शब्द देतो गेले अडीच वर्षामध्ये झाले त्यावर मला बोलायचे नाही, टीका करायची नाही. पुडच्या अडीच वर्षात शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लावायची हिंमत कोणी करणार नाही. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि मी मुख्यमंत्री म्हणून काम करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील मला राज्याला पैसे कमी पडू देणार नाही, असे सांगितले आहे.

सरकार स्थापन होऊन एक महिना पण नाही झाला. आम्ही शेतकऱ्याचे कर्ज, पेट्रोल डिझेल किमती, वीज यासारखे निर्णय घेतले आहे. विश्वासघात आम्ही केला का कोणी केला? हा विचार जनतेने केला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे गोरगरीबाचे सरकार आहे. या राज्यात गोरगरीब कोणी दिसणार नाही, असे काम आम्हाला करायचे आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT