Shivneri-Shivjayanti-CM Uddhav Thackeray
Shivneri-Shivjayanti-CM Uddhav Thackeray Sarkarnama
पुणे

मुख्यमंत्री शिवजयंतीच्या कार्यक्रमाला येणार नाहीत, कारण...

सरकारनामा ब्युरो, aswin@quintype.com

पुणे : पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळात त्यावरून राज्यात सध्या राजकीय टीका-टिप्पणी सुरू आहे. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज या संदर्भात आपली भूमिका मांडताना सोमय्यांचे आरोप फेटाळून लावले. कोरोना आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जम्बो कोविड सेंटरच्या उभारणीत कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. सगळी कामे पारदर्शक पद्धतीनं झाली आहेत. पुण्यात सध्या जम्बो हॉस्पिटल भ्रष्टाचार चर्चा सुरू आहेत, पण यात पारदर्शकता ठेवून अधिकारी अन सगळ्यांनी काम केलं, सगळे मिळून पैसे देत असतो, जम्बो हॉस्पिटलमध्ये राजकीय कुठलाही पदाधिकारी न घेता सगळे अधिकारी टाकले होते, यात सगळ्यांना सूचना दिल्या की यात पारदर्शक काम केलं पाहिजे, तसे आज मिटींग मध्ये चर्चा केली आता नोट तयार करून सगळ्यांना देणार आहोत. जम्बो मध्ये कुठलेही काही चुकीच होऊ दिल नाही एवढंच सांगतो.

याचवेळी त्यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमावरही भाष्य केलं. यावर्षी शिवनेरीवर कार्यक्रम होणार आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही. त्यांना चॉपरने प्रवासाला अजून परवानगी दिलेली नाही. मात्र सर्वत्र शिवजयंती साजरी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन निर्णय घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुणे महापालिकेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला किरीट सोमय्या यांचा सत्कार आणि संजय राऊत यांनी ईडीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यांवरही त्यांनी बोलणं टाळलं. तसेच, किराणा दुकानांतून वाईन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी १४ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. त्याबाबत विचारलं असता, 'अण्णा हजारे यांच्या पत्राची सरकारनं दखल घेतली असून प्रधान सचिव वल्सा नायर या आज अण्णांना भेटणार असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT