पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्यात जोरदारपणे सुरु असताना आज त्याला गालबोट लागले. ठाकरे शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad News) शहरप्रमुख अॅड.सचिन भोसले (Sachin Bhosale) यांच्यावर सायंकाळी हल्ला झाला.भाजपच्या कार्यकर्त्यांनी तो केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आघाडीचे चिंचवड पोटनिवडणुकीतील उमेदवार नाना काटे यांचा घरोघरी प्रचार करत असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर ब्लेडने गणेशनगर, थेरगाव येथे वार केले.त्यात राष्ट्रवादीचा गोरख पाषाणकर हा कार्यकर्ता जखमी झाला असून त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान,यामुळे चिंचवडचा प्रचार मुद्यावरून गुद्यावर गेला आहे.
या अगोदर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाण्यातील (मुंब्री) आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच शिवसेनी नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांना धमकी मिळाली असताना चिंचवडमध्ये शिवसेना शहरप्रमुखांवर प्रचार करत असताना थेट हल्लाच झाला. ब्लेडने त्यांच्यावर वार करण्यात आले. सिमेंटच्या ब्लॉकचे घाव घालण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रुग्णालयात जाऊन त्यांची भोसलेंकडे चौकशी केली. गुन्हा नोंदविण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. या हल्याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही ताब्यात घेतलेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.