Chinchwad By-Election
Chinchwad By-Election  Sarkarnama
पुणे

Chinchwad By-Election : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी : 'या' सहा नावांची चर्चा!

सरकारनामा ब्यूरो

Chinchwad By-Election : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत आता वेगवेगळे वळण येत आहेत. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात होते. मात्र राष्ट्रवादीने ही जागा लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. तर ऐनवेळी आम आदमी पार्टीकडूनही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर झाले आहे. भाजपकडून इच्छुकांची गर्दी दिसत असतानाच आता राष्ट्रवादीकडूनही इच्छुकांची नावे पुढे येत आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आता राष्ट्रवादीकडून इच्छुकांची गर्दी दिसत आहे. राष्ट्रवादीकडून चिंचवड लढण्यासाठी अनेक संभाव्य उमेदवार पुढे आले आहेत. यामध्ये भाऊसाहेब भोईर, नाना उर्फ विठ्ठल काटे, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप यांची नावे चर्चेतून पुढे येत आहेत.

दुसरीकडे भाजपाकडूनही उमेदवारीवरून चित्र जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. भाजप जगताप यांच्या कुटुंबामध्येच उमेदवार देणार असल्याचे जवळ-जवळ निश्चित करण्यात आले आहे. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप अथवा भाऊ शंकर जगताप यांनाच भाजपची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. राहुल कलाटे हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT