Election Commission
Election Commission Sarkarnama
पुणे

Pune bypoll Election : चिंचवडची मतमोजणी होणार १४ टेबलांवर; ३७ फेऱ्यांसाठी लागणार १४ तास

सरकारनामा ब्युरो

Chinchwad Election : कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (२६ फेब्रवारी) मतदान झाले. त्याचा निकाल गुरुवारी (ता. २ मार्च) लागणार आहे. मतमोजणीसाठी जय्यत तयारी झाली आहे. त्या मतमोजणी केंद्राची पाहणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी आज केली. त्यावेळी त्यांनी या ठिकाणी करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला.

पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) पोलीस सहआयुक्त मनोज लोहिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले आदींनीही सुरक्षेचा आढावा घेतला. त्यांनी चिंचवडची मतमोजणी होणाऱ्या शंकर आण्णा गावडे कामगार भवन, थेरगाव येथील मतमोजणी केंद्राच्या सुरक्षाव्यवस्थेची पाहणी केली. कसब्याची मतमोजणी कोरेगाव, पुणे येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात होणार आहे.

सर्वात जास्त मतदारसंख्या असलेल्या चिंचवड (Chinchwad) मतदारसंघात पन्नास टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे येथे मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात आले आहेत. येथे मतमोजणीच्या ३७ फेऱ्या होणार आहेत. त्यानंतर अधिकृत अंतिम निकाल येण्यासाठी रात्रीचे दहा वाजणार आहेत. मात्र, कसबा हा तुलनेने खूपच लहान मतदारसंघ असल्याने तेथील निकाल खूप लवकर लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चिंचवडमध्ये सर्वाधिक म्हणजे ५१० मतदान केंद्र होते. तसेच उमेदवारांचीही संख्या जास्त म्हणजे २८ होती. चिंचवडला २ लाख ८७ हजार ४७९ इतके मतदान झालेले आहे. याव्यतिरिक्त टपाली मतदानही आहे. त्यामुळे सकाळी सात वाजता सुरु झालेल्या या मतमोजणीचा अंतिम निकाल जाहीर करण्यासाठी किमान १४ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले (Sachin Dhole) यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT