Uddhav Thackeray, Chitra Wagh sarkarnama
पुणे

सरड्याप्रमाणे रंग बदलणारे ठाकरे सरकार ; त्यांचा खरा रंग जनतेसमोर आणणार!

''तुम्ही कुठल्याही रंगात रंगा, तुमचा खरा रंग आम्ही जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही,''

सरकारनामा ब्युरो

पिंपरी चिंचवड : धुलीवंदनाचा सण सगळीकडे आज उत्साहात साजरा होत आहे. राज्यभर होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह पाहायला मिळतोय. सगळीकडे रंगाची बरसात होतेय. होळीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. अश्यात राजकीय मंडळींही विरोधकांवर टोलेबाजी करीत शाब्दीक रंगाची बरसात करीत आहेत.

''महाविकास आघाडी सरकारला (Uddhav Thackeray government) रंगच राहिलेला नसून सरड्याप्रमाणे रंग बदलणारे हे सरकार आहे,'' अशी टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh)यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवडमध्ये केली. ''तुम्ही कुठल्याही रंगात रंगा, तुमचा खरा रंग आम्ही जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही,'' असा इशाराही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. आरंभ सोशल फाउंडेशनने आयोजित केलेल्या ''रंगवर्षा २०२२'' मध्ये वाघ आल्या होत्या. त्यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.

सध्या रोजच धुळवड : राऊत

''भाजप भेसळयुक्त रंग वापरत आहे. भाजप नकली रंग वापरत आहे. आम्ही राजकीय धुळवड कधीच खेळत नाहीत. महाराष्ट्रात सध्या रोजच धुळवड खेळली जात आहे. पण वर्षातून एकदा अशा लोकांची धुळवड करायला हरकत नाही. होळी आणि शिमग्यात फरक आहे. भाजपनं शिमग्याचा खरा अर्थ समजून घ्यावा. त्या पद्धतीनं रंग भाजपनं खेळावेत. महाराष्ट्राचा रंग स्वाभिमानाचा, ऐक्यतेचा, अखंडतेचा आहे हे त्यांनी समजून घ्यावं,'' असा सल्ला विरोधी पक्षनते देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.

आमचा रंग ओरिजनल : दानवे

संजय राऊतांना रेल्वे राज्यमंत्री रावनसाहेब दानवे (Raosaheb Danve)यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ''आमचा रंग ओरिजनल आहे. कुणाचा रंग कसा आहे, हे निवडणुकीत ठरतं. शिवसेनेनं (Shiv Sena) दाऊदच्या माणसाला साथ दिली तेव्हाच त्यांचा रंग फिका पडलाय,'' असा टोमणा त्यांनी राऊतांना लगावला आहे.

पालिका निवडणुकीत आमचे रंग दाखवविणार : शिंदे

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ''दोन वर्षानंतर आपण होळी रंगपंचमी साजरी करत आहोत.धर्मवीर आनंद दिघे यांनी अनेक उपक्रम आणि सण साजरे करत आले तेच आम्ही पुढे नेत आहोत. आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही आमचे रंग दाखवून देऊ,'' आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी हे विधान महत्वपूर्ण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT