Clash Between Bjp In Pune front murlidhar mohol
Clash Between Bjp In Pune front murlidhar mohol sarkarnama
पुणे

Video Murlidhar Mohol : मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोरच भिडले भाजप कार्यकर्ते, नेमकं काय घडलं?

Sudesh Mitkar

Pune News : पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा चांगल्या मताधिक्याने विजय झाला आहे. पहिल्यांदाच खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडल्याने पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

यामुळे भाजपाकडून मुरलीधर मोहोळ यांच्या अभिनंदनाचे कार्यक्रम विविध भागात घेण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच एका कार्यक्रमात भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडल्याचं समोर आला आहे. मात्र, असं काहीच घडलं नसल्याचं सांगत भाजपने या प्रकरणापासून आपले हात झटकले आहेत.

सध्या पुण्यातील सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मंदिराच्या बाहेर दोन गटातील कार्यकर्ते एकामेकांसमोर आल्याचं पाहायला मिळत आहेत. मंदिराच्या परिसरामधील असलेला ह्या दोन सेकंदाच्या व्हिडिओत मारहाणीची दृश्य पाहायला मिळत आहेत.

हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी असलेले नितीन कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सदगुरू शंकर महाराज मठ येथे हाणामारीचा प्रकार घडल्याचा दावा नितीन कदम यांनी केला आहे.

नितीन कदम यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "सदगुरू शंकर महाराज मठ अशी पवित्र जागा देखील भाजपच्या गुंडांनी सोडली नाही! तेथे देखील हाणामारीचा प्रकार... दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हेच भाजपचे ( bjp ) गुंड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पैसे वाटत होते.. प्रश्न हा आहे की पोलिस आयुक्त कारवाईचे धाडस दाखवणार का?"

दरम्यान, हा सर्व प्रकार पर्वती विधानसभा मतदारसंघातील सदगुरू शंकर महाराज मठ या परिसरातील असल्याचं सांगण्यात येत आहे. मानपानाच्या गोष्टीवरून भाजपचे दोन गट भिडले असल्याचे बोलले जात आहे. यावेळी नुकतेच केंद्रीय मंत्री झालेले मुरलीधर मोहोळ (murlidhar Mohol) देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्याशी संपर्क साधला. घाटे म्हणाले, "केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे त्या ठिकाणी दर्शनाला गेले असता तेथील मंदिर प्रशासन आणि दर्शनाला आलेल्या लोकांमध्ये मंदिरात प्रवेश करण्यावरून वाद झाला आहे. तिथे भाजपच्या कोणत्याही गटात वाद झाला नाही. अथवा त्यात भाजप कार्यकर्त्यांचा कोणताही संबंध नाही."

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT