Shiv Sena sarkarnama
पुणे

शिवसेना ठाकरे गटातील जिल्हा संघटक अन् माजी सरपंचात हणामारी; मशाल यात्रेला गालबोट

हणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल झाला आहे

डी के वळसे पाटील

मंचर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी (ता.11) मशाल क्रांती ज्योतीचे स्वागत करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे जिल्हा संघटक राजाराम बाणखेले व माजी सरपंच दत्ता गांजाळे यांच्यात हाणामारी झाली आहे. तालुका प्रमुख दिलीप पवळे व अन्य कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून एकमेकाला भिडलेल्या दोघांना बाजूला करून भांडण शांत केले. झालेल्या हाणामारीचे व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

शिवसेना (Shiv Sena) ठाकरे पक्षाला मशाल चिन्ह मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी शिवजन्म भूमी, किल्ले शिवनेरी ते मातोश्री (मुंबई) मशाल क्रांती ज्योतीचे आजोयजन जिल्हाप्रमुख सुरेश भोर, जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे यांच्या नेतृत्वाखाली मंचर येथे झाले.

त्या वेळी ज्योत हातात घेण्यासाठी दत्ता गांजाळे आले. त्यावेळी रागावून राजाराम बाणखेले म्हणाले, ''शिंदेगट व भाजपच्या व्यासपिठावर वावर असणाऱ्याचे येथे काय काम आहे. येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यावर निष्टा असलेल्यांनाच मशालीचे स्वागत करण्याचे अधिकार आहे.'' त्यातूनच एकमेकाला दोघे नेते भिडले.

दत्ता गांजाळे म्हणाले, शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर मी कधी हि शिंदे गटाच्या कार्यक्रमाला हजर राहिलो नाही. माझ्यावरचे आरोप चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत. उद्धव ठाकरे आमच्या हृदयात आहेत. त्यामुळे अनेक पक्ष बदलून आलेल्यानी निष्ठे विषयी बोलू नये. राजाराम बाणखेले व दत्ता गांजाळे यांच्यासमवेत बैठक घेवून गैरसमज दूर केले जातील. असे सुरेश भोर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT