Daund Politics : पुण्यातलं दौंड गाठून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर तब्ब्ल ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणात कुल यांना सरकार पाठीशी घालत आहे, त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी करत राऊत यांनी दौंड तालुक्यात सभाही घेतली. राऊतांच्या या आरोपामुळे कुल अडचणीत येण्याची शक्यता होती. अशातच राज्य सरकारने त्यांनी क्लीन चिट देऊन राऊतांच्या आरोपांना केराची टोपली दाखवली आहे.
काही महिन्यांपूर्वी खासदार संजय राऊतांनी राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले होते, भीमा-पाटस सहकारी साखर कारख्यान्यात ५०० कोटींचे गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे, राऊतांनी याबाबत देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले होते. तसेच, कुल यांची चौकशी ईडी आणि सीबीआय मार्फेत करण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर आज राज्य सरकारने नुकतीच त्यांना क्लीन चीट दिली.
फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात राऊतांनी गंभीर आरोप केले होते. राहुल कुल यांनी २०१६ ते २०२२ या काळात गळीत हंगाम बंद असताना खुल्या बाजारात साखरेची विक्री केली. इतकेच नव्हे तरकारखान्याने बँकांचे थकीत कर्ज बुडवल्याचा आरोप राऊतांनी केला होता.
आपल्या नेतृत्वातील सरकारने सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार खणून काढण्याचे ठरवले आहे. भाजपचे काही नेते प्रमुख विरोधी पक्षांचे व्यवहार, त्यांचे साखर कारखाने याबाबत भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणत असतात आणि त्या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिराही लावला जातो. भ्रष्टाचाराला धर्म व राजकीय पक्ष नसतो.त्यामुळे भ्रष्टाचाराची वाळवी नष्ट होणे गरजेचे आहे, असं सांगत संजय राऊतांनी भीमा सहकारी साखर कारखान्यात गेल्या काही वर्षांत ५०० कोटी रुपयांचे ‘मनी लाँडरिंग’ केल्याच आरोप केला होता. तसेच, या कारखान्यात जनतेच्या पैशांची प्रचंड लुटमार झाली असून हे प्रकरण तत्काळ ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्या ताब्यात देऊन भीमा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संजय राऊतांनी केली होती.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.