CM Devendra Fadnavis pays tribute to Shivaji Maharaj in an advertisement, sparking debate over Maratha reservation issue. sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पानभर जाहिरात, एक फोटो आणि मराठा आरक्षणाचा सूचक संदेश?

Devendra Fadnavis Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर जीआर निघाला आहे. मात्र, मराठ्यांचा प्रश्न सोडवण्याचे श्रेय देवेंद्र फडणवीसांकडे जात असल्याचे भाजप नेते सांगत आहेत. त्यातच आज वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीमधून सूचक संदेश दिल्याचे मानले जात आहे.

Roshan More

Devendra Fadnavis News : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने जीआर काढून हैदराबाद गॅझेटनुसार दाखले देणार असल्याचे स्पष्ट केले. हा मराठ्यांचा आंदोलनाचा विजय आहे, असे म्हणत जरांगे हा मागील 75 वर्षातील सर्वात मोठा विजय असल्याचे वर्णन केले. तर, भाजपमधील मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचा प्रश्न सोडवला, असे म्हणत याचे श्रेय फडणवीसांना दिले.

जीआरचे श्रेय नेमके कोणाचे याची चर्चा सुरू असतानाच आज (शनिवारी) महाराष्ट्रातील प्रमुख वर्तमानपत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांना फुलं अर्पण करत असलेला फोटो असलेली पानभर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीमध्ये शिवाजी महाराजांची राजमुद्रा देखील आहे. तसेच जाहिरातीमध्ये केवळ 'देवाभाऊ' असा उल्लेख आहे.

ही जाहिरात नेमकी कोणी दिली, याचा कोणताही उल्लेख जाहिरातीमध्य नाही. मात्र, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सोडवल्याचे अप्रत्यक्ष ठसवण्यासाठी ही जाहिरात दिल्याची चर्चा आहे.

राज्यात गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजतो आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारला या विषयावर निर्णय घ्यावा लागला. आरक्षण देण्याच्या प्रक्रियेत फडणवीस यांचा मोठा सहभाग असल्याचे भाजप नेहमीच सांगत आले आहे. तरीदेखील, या जाहिरातीत आरक्षणासंबंधी थेट उल्लेख टाळण्यात आल्याने देखील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ओबीसी समाजाची नाराजी टाळली

सरकारने काढलेल्या जीआरमुळे मराठा समाजाची ओबीसीमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप होत आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजावर अन्याय झाला नाही. नियमानुसार जे पात्र असतील त्यांनाच फायदा मिळणार आहे. ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी करू देणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच जाहिरातीमध्ये देखील मराठा आरक्षणाचा उल्लेख न करता ओबीसी समाजाची नाराजी देखील टाळल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT