पुणे : गणपतींचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर आहेत. भाविकांची गर्दी, वाहतूक कोंडी आणि पाऊस यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांचा दौरा चर्चेत आला. मात्र या दौऱ्यात पुणेकरांचे हाल होऊ नयेत, म्हणून शिंदे यांचे ओएसडी रस्त्यावर उतरले.
पुण्यात आधीच गणेश भक्तांची प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी, पावसाचा खोळंबा त्यात मुख्यमंत्र्यांच्या ताफाची भर पडली. मुख्यमंत्र्यांची छबी आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अनेक जणांनी त्यांच्या ताफ्याभोवती गर्दी केली होती.
गणेशभक्तीची आणि वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) डॉ. राहुल गेठे हे थेट गाडीतून उतरले अन् त्यांनी वाहतुकीचा शिस्त लावून रस्ता मोकळा करून दिला.
मुख्यमंत्र्यांचा ताफा रस्त्यावर फार काळ थांबू नये आणि गणेशभक्त आणि वाहनचालक यात अडकणार नाहीत याचा बंदोबस्त गेठे यांनी केला. त्यामुळेच गर्दीमुळे लांबणारे मुख्यमंत्र्यांचे गणपती दर्शन लवकर झाले.
डॉ. राहुल गेठे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे ओएसडी आहेत. ते नेहमीच मुख्यमंत्र्यांसोबत असतात. पुण्यातील शिंदे यांचागणपती दर्शन दौऱ्यातही ते होते.
मुख्यमंत्री शहरात असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सकाळपासून पावसाने लावलेली हजेरी आणि मुख्यमंत्र्यांच्या दौरा यामुळे वाहनचालक दुहेरी कोंडीत अडकले आहेत.मुख्यमंत्री येणार म्हणून सकाळी अकरापासूनच बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता काही ठिकाणी बंद करण्यात आला आहे. बंद रस्त्यावरील वाहतूक इतर मार्गावर वळविण्यात आल्याने पर्यायी रस्त्यांवर वाहतुकीचा ताण पडला आहे. त्यामुळे या रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.