Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
पुणे

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचे गणेश दर्शन : भाविक, वाहनचालकांनी अनुभवला 'वाहतूक कोंडींचा जिवंत देखावा'

सरकारनामा ब्युरो

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे पुण्यात गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत. दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे पुण्यात दाखल झाले आहे. त्यांच्या ताफ्याला कुठेही वाहतुकीचा अडथळा येऊ नये म्हणून शहरातील काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्याचा फटका गणेशभक्त व वाहनचालकांना सोसावा लागत आहे.

मुख्यमंत्री शहरात असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सकाळपासून पावसाने लावलेली हजेरी आणि मुख्यमंत्र्यांच्या दौरा यामुळे वाहनचालक दुहेरी कोंडीत अडकले आहेत.

मुख्यमंत्री येणार म्हणून सकाळी अकरापासूनच बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता काही ठिकाणी बंद करण्यात आला आहे. बंद रस्त्यावरील वाहतूक इतर मार्गावर वळविण्यात आल्याने पर्यायी रस्त्यांवर वाहतुकीचा ताण पडला आहे. त्यामुळे या रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली आहे.

लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, जंगली महाराज रस्ता, गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, कर्वे रस्त्यावर देखील वाहतूक कोंडी आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने शहरातील मध्यवस्तीत वाहतुक कोंडी झाली आहे. स्वारगेट, डेक्कन, महापालिकेजवळचा पूल, शिवाजीनगर यांच्यासह शहरातील मध्य भागातील गल्ली बोळातील रस्ते देखील जाम झाल्याची स्थिती आहे.

मुख्यमंत्री पुण्यात येणार असल्याने सकाळपासून काही रस्ते सुरक्षिततेच्या कारणावरून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे, असे वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. कसबा गणपती साठी दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री आले असता माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT