CM Eknath Shinde| 
पुणे

Eknath Shinde news| मुख्यमंत्री शिंदेचा गौप्यस्फोट: दिल्लीत जाण्याचे सांगितले कारण

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मध्यरात्री अचानक दिल्लीत दाखल झाल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. अशात शिवसेनेच्या आमदारांनंतर आता खासदारांकडून बंडांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मध्यरात्री दिल्लीत एका हॉटेलमध्ये आधीच उपस्थित असलेल्या खासदारांसोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी शिवसेना (Shivsena) खासदारांच्या बंडाबाबत आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.

दिल्लीत प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत, 'आमच्याकडे १२ नव्हे तर १८ खासदार असल्याचा, गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे. लोकसभेत शिवसेनेचे एकूण १८ खासदार आहेत. हे सर्व खासदार लवकरच आपल्यासोबत येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. पण यातील सहा खासदार अद्यापही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे या सहा खासदारांपैकीही काही खासदार आपल्याकडे आणण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरु आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तसेच, सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावर होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आपण दिल्लीत आलो असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. राज्यातील ओबीसींना न्याय देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. राज्याच्या दृष्टीनेही ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने तज्ज्ञ वकिलांशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यावेळी स्पष्ट केले.

दिल्ली आणि महाराष्ट्रातील वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार आजच बंडाचा झेंडा फडकवणार का, असाही सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. सोमवारी( १८ जुलै)
राष्ट्रपतिपदाच्या मतदान प्रक्रियेनंतर शिंदे गटाच्या ऑनलाईन बैठकीला शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदार उपस्थित असल्याचे बोलले जाते. जवळपास अर्धा तासांच्या बैठकीनंतर शिंदे गटाच्या गटनेते पदी राहुल शेवाळे आणि मुख्य प्रतोदपदासाठी भावना गवळी यांच्या नावाची चर्चा झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे शिंदे गट आता नवीन गटही स्थापन करण्याच्या तयारीत असून त्यासाठी चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे सोमवारी रात्री दिल्लीला रवाना झाल्याचे बोलले जात आहेे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून हिरवा कंदील मिळताच आजच (१९ जुलै) लोकसभेत यासंदर्भातील पत्र देण्यात येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT