Narendra Modi-Uddhav Thaceray sarkarnama
पुणे

मोठी बातमी : मोदींच्या पुणे दौऱ्यात उद्धव ठाकरे येणार नाहीत... या नेत्यावर जबाबदारी

Pune Metro : पुणे शहरातील पाच किलोमीटरच्या मेट्रोचे उदघाटन मोदी यांच्या हस्ते होणार

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (ता. सहा मार्च) (PM Modi Pune tour) पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री सहभागी असण्याची प्रथा असते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे या दौऱ्यात सहभागी होणार नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

पुण्याच्या मेट्रोतील पहिल्या टप्प्याचे उदघाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पाच किलोमीटरचा हा टप्पा आहे. याशिवाय पुणे महापालिकेच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे ते अनावरण करणार आहेत. या दौऱ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहभागी होणार आहेत. पुणे शहर राष्ट्रवादी काॅंग्रेस मात्र मोदींच्या दौऱ्याच्या विरोधात आंदोलन करणार असून त्यांना काळे झेंडे दाखविणार आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या आजारपणामुळे अद्याप लांबच्या प्रवासाची मान्यता मिळाली नसल्याने ते उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्याऐवजी उद्योगमंत्री सुभाष देसाई हे मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून मोदींच्या दौऱ्यात सहभागी होणार आहेत.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की पंतप्रधान पुण्यात येत आहेत. मी तिथं आहे. सुभाष देसाई मुख्यमंत्र्याचे प्रतिनिधी म्हणून येत आहेत. पुण्यात मेट्रोच काम कुठवर आलय हे सगळ्यांना माहिती आहे. एवढा कार्यक्रम झाल की मी त्यावर बोलेन.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक आज पुण्यात पार पडली. त्याबद्दलही अजित पवार यांनी माहिती दिली. शिल्लक ऊस लवकर कसा जाईल आणि तो शेतकऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही, हे पाहिले जाईल. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको हीच आमची भूमिका आहे. त्यासाठी सरकार म्हणून ज्या गोष्टी करायला हव्यात त्या आम्ही केल्या आहेत. मध्य प्रदेश सरकारने ज्या पद्धतीने आपल्या निवडणुका पुढे ढकलल्या, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात करण्याचे प्रयत्न सुरू आहे. ओबीसींसाठीचा डेटा ३ ते ४ महिन्यात गोळा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ओबीसी आरक्षणासाठी आम्ही नवा आयोग नेमणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी तशा सूचना दिल्या आहेत.नवीन अध्यक्ष नेमून पुन्हा काम सुरू करणार आहोत, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT