UDDHAV-THACKERAY-TINGRE
UDDHAV-THACKERAY-TINGRE 
पुणे

मुख्यमंत्र्यांना पुण्याची काळजी, सुनील टिंगरे यांना आला फोन!

अन्वर मोमीन

वडगाव शेरी : कोरोनाग्रस्तांची संख्या मुंबईपाठोपाठ पुण्यात सर्वाधिक असल्यामुळे राज्य सरकार संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. याचा प्रत्यय आमदार सुनील टिंगरे यांनाही आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः आमदार टिंगरे यांना फोन करून पुणे शहराची परिस्थिती जाणून घेतली. आमदार टिंगरे यांनी यानिमित्त काही विषय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले. त्यावर राज्य शासन उपायोजना करीत असलयाचा विश्वास देत आणखी काही अडचणी असतील तर नक्की सांगा आणि काळजी घ्या, असा प्रेमळ सल्लाही मुख्यमंत्रांनी दिला.

राज्य सरकारकडून सर्व उपाययोजना व्यवस्थित झाल्या आहेत का, प्रशासन व्यवस्थित काम करीत आहे का, अशीही विचारणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या रोज काही प्रमाणात वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी चांगले काम करीत असून निर्जंतुकीकरणसाठी औषध फवारणीचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती  टिंगरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

टिंगरे हे पुण्यातील बांधकाम ठेकेदारांच्या संघटनेचे अध्यक्षही आहेत. लॉकडाऊन काळात बांधकाम क्षेत्रातील मजुरांच्या समस्यांची त्यांना चांगली कल्पना आहे. या मजुरांकडे रेशन कार्ड नाही, त्यामुळे शासनाने जाहीर केलेले अन्नधान्य देण्याच्या योजनेचा त्लाभ मजुरांना मिळण्यात अडचणी आहेत, ही समस्या टिंगरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. या समस्येवर राज्य सरकार उपाययोजना करीत असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी  दिला.

कोरोनाबाबत पुणे शहरातील परिस्थिती जाणून घेतल्यानंतर, " तुम्ही काम करताना स्वतःची काळजी घ्या. गर्दीमध्ये मिसळू नका" असा प्रेमळ सल्ला द्यायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत.

कोरोनाबाबत पालकमंत्री म्ह्णून अजितदादा आमच्यासोबत  कायम संपर्कात आहेत. मुख्यमंत्र्यांनीही  फोन करून प्रशासकीय अडीअडचणी समजून घेतल्या. इतके बारीक लक्ष देणारे नेतृत्व लाभल्याने आमची जबाबदारी अधिक वाढली आहे, अशी प्रतिक्रिया टिंगरे यांनी यावर दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT