Balasaheb patil
Balasaheb patil sarkarnama
पुणे

सहकार हा राज्याचा विषय, केंद्र सरकार त्यावर अतिक्रमण करत आहे

महेंद्र शिंदे

कडूस (जि. पुणे) : सहकार हा विषय राज्याच्या सूचीमध्ये आहे, त्यामुळे सहकाराचे कायदे करण्याचा अधिकार व स्वायत्ता राज्याला आहे,' असे ठणकावून सांगत केंद्र सरकार सहकारात नवीन कायदे आणून राज्याच्या मूलभूत अधिकारावर गंडांतर आणीत आहे, अशी टीका राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केला. (Co-operative is in the list of state, state has the right to make laws : Balasaheb Patil)

खेड तालुक्यातील कडूस येथे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या शाखा नूतनीकरणाचे उदघाटन राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते रविवारी (ता. 31 ऑक्टोबर) झाले. त्यावेळी ते बोलत होते. पाटील यांनी केंद्र सरकारच्या सहकार धोरणावर कडाडून टीका केली.

ते म्हणाले, 'राजगुरूनगर सहकारी बँकेचे काम उत्तम प्रकारे चालले आहे. बँकेने नवीन कायदे स्वीकारले आहे. परंतु केंद्र सरकारने नवीन एक कायदा आणला आहे. या कायद्याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. दृष्टिकोन चांगला आहे. परंतु सहकार राज्याच्या सूचीत आहे. सहकाराचे कायदे करण्याचा अधिकार हा राज्याला आहे. केंद्र सरकार मल्टीस्टेट बँका, मल्टीस्टेट कारखाने, मल्टीस्टेट दूध संस्था यांच्यावर बंधने लावू शकतात. सहकार बळकट करण्यासाठी राज्याने सहकार कायद्यात वेळोवेळी बदल केले आहेत. येथून पुढेही बदल करू. परंतु केंद्राच्या भूमिकेबाबत विचार व्हायला पाहिजे. राज्याच्या सूचीमधील सहकारावर अधिक निर्बंध आणले जात आहे. हे येऊ नयेत, यासाठी राज्य सरकार, बँक असोसिएशन व राज्य सहकारी बँकही कोर्टात जात आहे.'

आमदार मोहिते यांनीही बँकेच्या कामकाजाबाबत संचालक मंडळ व व्यवस्थापन विभागाचे कौतुक केले. ते म्हणाले, '1931 मध्ये राजगुरूनगरमध्ये एका छोट्याशा घरात सुरू झालेली व सध्या सतरा शाखा असलेली बँक उत्तम कामकाजामुळे उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वसामान्य व गोरगरीबांच्या जिव्हाळ्याची बँक ठरली आहे.'

या वेळी खेडचे आमदार व पुणे जिल्हा बँकेचे संचालक दिलीप मोहिते, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज, उपाध्यक्ष अरुण थिगळे, संचालक प्रताप आहेर, किरण आहेर, ॲड. मुकुंद आवटे, किरण मांजरे, ॲड.दत्तात्रेय गोरे, सतीश नाईकरे, गणेश थिगळे, विजया शिंदे, दिनेश ओसवाल, धनंजय कहाणे, राहुल तांबे, हेमलता टाकळकर, परेश खांगटे, सागर पाटोळे, धर्मेंद्र खांडरे, राजेंद्र सांडभोर, किसन गारगोटे, जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले, सहायक निबंधक हरिश्चंद्र कांबळे, जिल्हा परिषद सदस्य तनुजा घनवट, नंदा सुकाळे, सरपंच निवृत्ती नेहेरे, शाखा व्यवस्थापक विजय सातकर उपस्थित होते.

दरम्यान, सलग 51 वर्ष बँकेचे संचालक पद भूषविलेले प्रताप आहेर यांचा सहकारमंत्री पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन उपसरपंच कैलास मुसळे यांनी केले, तर बँकेचे उपाध्यक्ष अरुण थिगळे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT