Co-operative Societies Election
Co-operative Societies Election  sarkarnama
पुणे

Co-operative Societies Election : सहकारी संस्थांच्या निवडणुका 'या' कारणामुळे पुढे गेल्या ; सरकारचं स्पष्टीकरण

सरकारनामा ब्यूरों

Co-operative Societies Election : राज्यातील ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकाबाबत राज्य सरकारच्या सहकार विभागाकडून नवा आदेश काढण्यात आला आहे. (Co-operative Societies Election news update)

सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या असल्याचे या आदेशात म्हटलं आहे. या निवडणुका का स्थगित करण्यात आल्या, याबाबत राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीत होत आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीत सुरु आहेत. त्यामुळे गावागावात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीत सहभाग नोंदविता यावा, यासाठी सहकारी संस्थांच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत स्थगित केल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानेही ७ हजार १४७ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरु आहे. त्यामध्ये ‘अ’ वर्गातील ३८, ‘ब’ वर्गातील १ हजार १७०, ‘क’ वर्गातील ३ हजार १५१ आणि ‘ड’ वर्गातील २ हजार ७८८ सहकारी संस्थांचा समावेश आहे.

१८ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत राज्यातील ७ हजार ५१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या ग्रामपंचायतीचा निकाल २० डिसेंबर रोजी लागणार आहे.

‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या सदस्यांची संख्या अधिक आहे. या सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र एक किंवा अनेक तालुक्यांशी संबंधित असल्यामुळे बरेच मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे सरकारनं म्हटलं आहे.

ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीत सुरु आहेत. त्यामुळे गावागावात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या सदस्यांची संख्या अधिक आहे. या सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र एक किंवा अनेक तालुक्यांशी संबंधित असल्यामुळे बरेच मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT