पुणे

हर्षवर्धन यांनी दहा लाख रुपये देताच भरणेंचा पंधरा लाखाचा आकडा!

सरकारनामा ब्यूरो

वडापुरी : नेत्यांमधील स्पर्धेत गावकऱ्यांचा कसा फायदा होतो, याचे उदाहरण इंदापुरात घडले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रेय भरणे हे एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचे सोडत नाही. मात्र एका मंदिरासाठी मदत निधी देतानाही या दोघांतील स्पर्धा दिसून आली.

शेटफळ पाटी ( ता. इंदापूर ) येथिल प्रसिद्ध देवस्थान दक्षिण मुखी मारूत्ती मंदिराच्या प्रारंगणात प्रदिपदादा गारटकर मिञ परीवाराच्या वतिने अखंड हरिनाम सप्ताहात तुलसी रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळयात,राज्यांचे माजी सहकारमंञी हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे एकाच वेळी समोरासमोर उपस्थित राहिले. यावेळी आयोजकांनी मंदिर उभारणीसाठी दोघांनाही मदत मागितली. मात्र ही मदत कोणत्याही शासकीय निधीची नको तर रोख दया, असे सांगण्याची तलाखीही गावकऱ्यांनी केली. 

दोघे एकाच वेळी उपस्थित राहिल्याने उपस्थितांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. अनेक नेते आमदार किंवा खासदार निधीतून सभामंडपाचे काम करून देतो, असे सांगत वेळ मारून नेतात. मात्र गावकऱ्यांनी थेट रोख रकमेचा आग्रह केल्याने दोघांचाही नाइलाज झाला. त्यात विधानसभा निवडणूक जवळ आल्याने या नेत्यांना गावकऱ्यांना नाराज करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनीही मोठेपणा दाखवत दोघांनी मिळून पंचवीस लाख रुपये दिले.  या वेळी दोघांनीही एकमेकांना कोपरखळ्या मारल्या.

या वेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, प्रदीपदादा गारटकर मिञ परीवाराच्या माध्यमातून तुलशी रामायणाचा ज्ञानयज्ञ सोहळा सुत्य उपक्रम आहे. मी दुसऱ्यासारखा वल्गना करणारा नेता नाही. येथील मारूत्ती देवस्थान जागृत असल्याने हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे दहा लाख रुपये बांधकामासाठी देत आहे.

यानंतर भरणे यांचे भाषण झाले. कोणत्याही श्रद्धास्थानास शब्द देण्याऐवजी थेट मदत करणे हे माझे कर्तव्य आहे त्यामुळे पंधरा लाख माझे बांधकाम उभारणीसाठी देत आहे, असे सांगत भरणे यांनीही टाळ्या घेतल्या. आता या मदतीच्या आकड्यानंतर इंदापुरात दोन्ही नेत्यांना एकाच वेळी एकाच कार्यक्रमाला बोलविण्याची स्पर्धा लागू नये म्हणजे झाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT