Pune Police Sarkarnama
पुणे

Pune News : शरद पवारांबद्दल सोशल मीडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या महिलेविरूद्ध तक्रार!

Sharad Pawar : अनघा घैसास यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.

सरकारनामा ब्यूरो

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल समाजमाध्यमावर आक्षेपार्ह लिखाण करून, त्यांची बदनामी केल्याबाबत पुण्यातील डेक्कन पोलिस स्थानकात एका महिलेविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांच्याकडून ही तक्रार करण्यात आली. यावेळी पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळेदेखील उपस्थित होते.

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील सौदामिनी हॅन्डलूम्स या दुकानाच्या संचालिका अनघा घैसास या नावाच्या महिलेने शरद पवार यांच्या विरूद्ध सामाज माध्यमावर अत्यंत खालच्या पातळीवरून टीका करून त्यांची प्रछन्न बदनामी केली. यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत.

या लिखाणात वापरण्यात आलेली भाषा अत्यंत असभ्य असून, त्याची प्रत पत्रासोबत पोलिसांना दिली आहे. अशा प्रकारचे लिखाण करून अनघा घैसास नावाच्या महिलेने भारतीय दंड विधान कायद्याचे अनेक तरतुदींचा भंग केला आहे.

तरी सदर बदनामीकारक मजकूर सामाजिक माध्यमातून प्रसारीत केल्याबाबत, अनघा घैसास यांच्याविरूद्ध प्रचलित कायद्यानुसार योग्य तो फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, म्हणून आमची ही लेखी फिर्याद आहे, असे पोलिसांना दिलेल्या पत्रात लिहले आहे, असे अंकुश काकडे यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT