Jitendra Awhad and Atul Londhe Patil Sarkarnama
पुणे

Pune News: राज गर्जे आत्महत्या प्रकरणात जितेंद्र आव्हाडांनंतर आता अतुल लोंढेंची उडी!

Pune Crime News: रॅगिंगला वैतागून एका विद्यार्थ्याने आपलं आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना घडली

सरकारनामा ब्यूरो

Pune news: पुण्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने रॅगिंगला वैतागून आपलं आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना घडली होती. आता या प्रकरणात काँग्रेसने उडी घेतली आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी याबाबत ट्वीट करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाबाबत ट्वीट केलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी याप्रकरणी पोलीस निरीक्षकांचे निलंबन करावे, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने रॅगिंगला कंटाळून आपलं आयुष्य संपवल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. राज रावसाहेब गर्जे (वय 22) असं या विद्यार्थ्याचे नाव आहे.

राजने मध्यस्थीने एका व्यक्तीला काही पैसे उसने घेऊन दिले होते. मात्र, ते पैसे संबधित व्यक्ती परत देत नव्हता. त्यामुळे राज मानसिक तणावात आला होता. या तणावातूनच राजने 10 मे रोजी आपलं आयुष्य संपवलं असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली होती.

त्यानंतर निरूपम जयवंत जोशी विरुद्ध आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजच्या वडिलांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी ट्विट करत या गरिबाला न्याय द्या, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही ट्वीट करत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

(Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT