Pimpri Congress Latest News Sarkarnama
पुणे

सोनियांच्या चौकशीविरोधात कॉंग्रेसने केला सत्याग्रह; मोदींवर केली टीका

Pimpri-Chinchwad|Kailas Kadam|Congress : गेल्या आठ वर्षांपासून भाजप सरकारच्या हुकुमशाहीमुळे देश अराजकतेकडे चालला आहे.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : सक्तवसुली संचालनालय तथा ईडी (ED) या केंद्रीय तपास यंत्रणेकडून कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांच्यानंतर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. याबाबत नोटीस मिळून त्यांची चौकशी होताच पाच दिवसांपूर्वीच (ता. २१ जुलै) कॉंग्रेसने देशभर तीव्र आंदोलन केले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा ती झाल्याने कॉंग्रेसने (Congress) पाच दिवसांतच पुन्हा आंदोलन आज केले. पिंपरी-चिंचवडमध्ये, तर सत्याग्रह करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम (Kailas Kadam) यांनी केंद्रातील भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) सडकून टीका केली. (Pimpri Congress Latest News)

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) काँग्रेसने आपल्या सर्वोच्च नेत्याच्या ईडी चौकशीविरोधात शहरातील नाशिक फाटा चौकात सत्याग्रह केला. काँग्रेसच्या वाढत्या जनधारामुळे सोनियांची चौकशी केली जात असल्याचा आरोप डॉ. कदम यांनी यावेळी केला. गेल्या आठ वर्षांपासून भाजप सरकारच्या हुकुमशाहीमुळे देश अराजकतेकडे चालला आहे. त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई वाढत असून त्याविरोधात काँग्रेस वेळोवेळी रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा जनाधार वाढत आहे. त्याच्या भीतीपोटी मोदी, शहा यांचे जुलमी सरकार हे गांधींची वारंवार चौकशी करून त्यांना नाहक त्रास देत आहे,असे ते म्हणाले.

दहा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ईडीनेच चौकशी करून हे प्रकरण संपवले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जोपर्यंत सोनिया गांधी यांना चौकशीनंतर परत येऊ दिले जात नाही तोपर्यंत सत्याग्रह सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले. या आंदोलनात माजी महापौर कवीचंद भाट, ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कर, माजी नगरसेवक बाबू नायर, माजी नगरसेविका निर्मला कदम, महिला शहराध्यक्ष सायली नढे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, सहकार सेल अध्यक्ष के. हरिनारायण, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहीतुले, डॉ. मनीषा गरूड, नंदा तुळसे, छायावती देसले, हिरा जाधव आदी सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT