Atul Londhe & Kailas Kadam
Atul Londhe & Kailas Kadam  Sarkarnama
पुणे

'सत्तर वर्षात कॉंग्रेसने जे उभे केले ते भाजपने सात वर्षात मातीत घातले'

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढले नाही, तर त्यासमोर भोंग्यावरच हनुमान चालिसा लावण्यास मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नुकतेच सांगितले आहे. त्यावरून राज्यातच नाही, तर देशभर वातावरण तापले असून प्रतिक्रिया उमटत आहेत. या भोंग्याच्या राजकारणावर कॉंग्रेसचे (Congress) प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी पिंपरीमध्ये (Pimpri-Chinchwad) बुधवारी (ता.११ मे) सडकून टीका केली.

रोज वाढत जाणाऱ्या महागाईचा आवाज दाबण्यासाठी भोंग्याचा आवाज वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजप करीत आहे, असे ते म्हणाले. महागाईबाबत त्यांनी निर्लज्जपणाचा कळस केल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.

भाजपला भ्रष्टाचाराची कीड पिंपरी-चिंचवडपर्यंत लागली असून त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या पाच वर्षात केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले. त्यामुळे नाशिक महापालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीनंतर पिंपरीतही अशी चौकशी पालिका निवडणुकीच्या तोंडावर लागणार का य़ाकडे आता लक्ष लागले आहे. कोरोना काळातील कोरोना सेंटर घोटाळ्यासह भाजपच्या इतरही अनेक भ्रष्टाचाराची उदाहरणे त्यांनी दिली. एकाही कोरोना रुग्णावर उपचार न करता भोसरीतील कोरोना सेंटरचालक संस्था स्पर्श हॉस्पिटलने पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून साडेतीन कोटी रूपये उकळले. त्यात लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार, प्रशासन आणि ठेकेदारांची अभद्र युती असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. त्यांचा रोख हा पालिकेतील माजी सत्ताधारी भाजप व त्यांचे भोसरीतील आमदार महेश लांडगे यांच्या दिशेने होता.

राष्ट्रद्रोहाचे कलम लोकशाहीत योग्य नाही हे काँग्रेसचे धोरण आहे, अशी प्रतिक्रिया लोंढे यांनी काल या कलमाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तात्पुरत्या स्थगिती आदेशावर दिली. यावेळी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष डॉ. कैलास कदम, राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे आदी उपस्थित होते. भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीपुरवठ्यासह एकही योजना पूर्ण न झाल्याचा आरोप लोंढे यांनी यावेळी केला. संतपीठाच्या नावाखाली शहरात चिखली येथे इंग्लिश माध्यमाची सीबीसी बोर्डाची खासगी शाळा त्यांनी सुरू केली. त्यातून संतपीठ स्थापनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला. ही शहरवासियांची फसवणूक आहे, असे ते म्हणाले. रस्ते सफाईतही त्यांनी शेकडो कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप लोंढे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT