Pimpri-Chinchwad News : वसाहतकालीन कायद्यांवर फुली मारणारी तीन नवी विधेयके केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसद अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता.११) लोकसभेत सादर केली. त्याचवेळी त्यांनी देशद्रोहाचे कलम वगळल्याचीही घोषणा केली. त्यावर कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शनिवार (ता.१२) पुण्यात भाष्य केले. हेरगिरी प्रकरणात पकडण्यात आलेले 'डीआरडीओ'तील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे 'आरएसएस'चे असल्याने त्यांना वाचविण्यासाठी देशद्रोहाचे कलम भाजपने (BJP) रद्द केल्याचा दावा त्यांनी केला.
देशाची गोपनीय माहिती दुश्मन देशाला पुरवणारा देशद्रोही असतो. प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तानला अशी माहिती देऊन सुद्धा त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही. कारण तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याने त्याला वाचवण्यासाठीच केंद्रातील भाजप सरकार प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे, असा दावा पटोलेंनी पत्रकारांशी बोलताना केला.
संभाजी भिडे जाहीरपणे दुसऱ्यांच्या धर्मावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करतात. त्यांच्याविरोधातही कारवाई केली जात नाही. कारण भाजपला तेच हवे आहे. जनतेच्या प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ते अशा लोकांच्या माध्यमातून जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात, असा आरोप पटोलेंनी यावेळी केला.
मित्रपक्षात काय चालले आहे, त्यात आम्हाला रस नाही, असे भाष्य त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) फुटीवर केले. जे राजकीय पक्ष भाजपाविरोधात लढण्यासाठी काँग्रेसबरोबर (Congress) येतील त्यांना बरोबर घेऊन लढणार आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या लढाईत काँग्रेसबरोबर असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.