Sangram Thopte Sarkarnama
पुणे

Sangram Thopte On Prataprao Jadhav: काँग्रेस आमदार फुटणार हा जावई शोध कुठून लागला ? संग्राम थोपटेंचा प्रतापराव जाधवांना टोला

Vijay Wadettiwar : विजय वड्डटीवार यांना विरोधी पक्षनेता केल्याने काँग्रेसचा एक मोठा गट फुटणार असल्याचे विधान खासदार प्रतापराव जाधव यांनी केले होते.

सरकारनामा ब्यूरो

Pune News: शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधवांनी काँग्रेसवर निशाणा साधत विजय वड्डटीवार यांना विरोधी पक्षनेता केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचा दावा करत काँग्रेसचा एक मोठा गट फुटणार असल्याचे विधान जाधव यांनी केले.

यावर आता काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेसचा कोणताही आमदार फुटणार नाही, असे सांगत काँग्रेस आमदार फुटणार हा जावई शोध कुठून लागला ? मला माहिती नाही, असे म्हणत संग्राम थोपटे यांनी प्रतापराव जाधवांना टोला लगावला.

कुणाच्या अंर्तगत नाराजीमुळे आमदार फुटतील, अशी परिस्थिती काँग्रेसमध्ये नाही, असे सांगत विरोधी पक्ष नेता होण्याची इच्छा असूनही आपल्याला डावललं गेल्याची खंतही त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना बोलून दाखवली. कामं करणाऱ्याला पद मिळण्याची अपेक्षा आसती. मात्र, काँग्रेसमध्ये निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात, पक्षातील सर्वजण तो निर्णय अंतिम मानतात, असंही संग्राम थोपटे यावेळी म्हणाले.

"पक्षाच्या धोरणाबाबत आम्ही थोपटें कुटुंब कायम काँग्रेसबरोबर राहिले आणि यापुढेही कायम राहू. आमदार म्हणून सलग तीन वेळा निवडून आलो असल्याने मी विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळावी म्हणून प्रयत्न करत होतो. कामं करणाऱ्या माणसाला वाटतं संधी मिळाली पाहिजे. 2019 ला मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्षपद मिळेल, अशीही अपेक्षा होती. आता विरोधी पक्षनेतेपद मिळेल, असेही वाटत होते, मात्र, संधी मिळाली नाही", अशी खंतही संग्राम थोपटे यांनी बोलून दाखवली.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT