Harshvardhan Sapkal sarkarnama
पुणे

Congress Politics : पुणे काँग्रेस शहराध्यक्षपदाबाबत प्रदेशाध्यक्षांनी घेतला निर्णय, आता 'त्या' सर्व चर्चांना फुलस्टॉप!

Congress Pune leadership : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मुंबईत झाल्यालेल्या बैठीकत पुण्यातील नेत्यांना गटबाजी थांबून निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहराध्यक्ष बदलण्याची मागणी पुणे काँग्रेस मधील 2 गटांनी लावून धरली होती.

Sudesh Mitkar

Pune News, 19 Jun : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मुंबईत झाल्यालेल्या बैठीकत पुण्यातील नेत्यांना गटबाजी थांबून निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहराध्यक्ष बदलण्याची मागणी पुणे काँग्रेस मधील 2 गटांनी लावून धरली होती.

तर शहराध्यक्ष असलेल्या अरविंद शिंदे यांनी महापालिका निवडणुका होईपर्यंत आपल्यालाच शहराध्यक्ष म्हणून कायम ठेवावं अशी मागणी लावून धरली होती. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या मुंबईतील बैठकीमध्ये वरिष्ठांकडून शहराध्यक्षपदाबाबत फायनल निर्णय अपेक्षित होता.

त्यानुसार मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये पक्षातील वरिष्ठांनी शहराध्यक्ष बदल आणि इतर राजकारणावर बोलण्यात साफ नकार दिला. तसेच आगामी निवडणुकींसाठी सर्वांनी एका दिलाने काम करण्याच्या सूचना देखील प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्या असल्याचं सांगितले जात आहे.

यामुळे एक प्रकारे शहराध्यक्ष बदलाच्या चर्चांना तूर्तास तरी पूर्णविराम मिळाला असून महापालिका निवडणुकीपूर्वी शहराध्यक्ष बदलण्याची शक्यता जवळपास मावळली असल्याचं बोललं जात आहे. मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक प्रभागांमध्ये उमेदवार देण्याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत.

त्यामुळे वेळ पडल्यास स्वबळावर निवडणूक लढण्याची वेळ आल्यास त्या पद्धतीची तयारी ठेवावी अशी सूचना वरिष्ठांकडून देण्यात आली आहे. तसेच आघाडी करायची का नाही याबाबत स्थानिक नेत्याचं मत विचारात घेतल्यानंतरच याबाबत निर्णय घेण्यात येईल असे देखील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आहे.

स्थानिक वरिष्ठ नेत्यांना महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात येणार असून त्या मतदार संघातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. तसेच दुसऱ्या फळीतील नेत्यांना देखील काही प्रभागांची जबाबदारी देणार येणार आहे. त्या प्रभातील नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी त्या नेत्यांवर राहणार आहे.

तसंच जर काही नेते एखाद्या उमेदवाराच्या तिकिटासाठी आग्रही असतील तर त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी देखील त्या नेत्याला घ्यावी लागणार आहे. तसेच तो उमेदवार काँग्रेसकडून करण्यात येणाऱ्या सर्वे मध्ये देखील निवडून येण्यास अनुकूल असावा लागणार आहे. तरच त्या उमेदवाराचा तिकीट फायनल केलं जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT