पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (रविवारी) पुण्यात मेट्रोचे (Pune Metro) उद्धघाटन होत आहे. त्याच्या स्वागतसाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. मोदी हे पुण्यात पाच तासांच्या दौर्यावर येत आहेत. यामुळे पुण्याला छावणीचे स्वरुप आले आहे. मोदींना pm (narendra modi) विरोध करण्यास राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेस आक्रमक झाली आहे. त्यांनी आंदोलनास सुरवात केली आहे.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने पोस्टरबाजीमधून मोदींचा निषेध केला जात आहे. काही ठिकाणी 'गो बॅक मोदी' अशी पोस्टर्सदेखील झळकत आहेत. कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टि्वट करीत मोदींवर टीका केली आहे.
शहर काँग्रेस पक्षाच्याने रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास टिळक चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी मोदी यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या. पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांनी टिळक चौकातून गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकाकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटकाव केला.
मोदी विविध कार्यक्रमानिमित्त रविवारी सकाळी पुण्यात दाखल झाले आहेत. त्यावेळी शहर काँग्रेस पक्षाने टिळक चौकात निदर्शने केली. हातात फलक, डोक्यावर काळी पट्टी बांधुन त्यांनी मोदी यांचा निषेध नोंदविला. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी पक्षाचे नेते मोहन जोशी, गोपाळ तिवारी, रविंद्र धंगेकर, कमल व्यवहारे आदी उपस्थित होते.
''छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच जनतेचे रक्षण हाच आपला धर्म मानला आहे. मोदी युद्धग्रस्त युक्रेनमध्ये देशांच्या मुलांना मृत्यूच्या दाढेत सोडून पक्षाचा प्रचार करत फिरत आहेत. यामुळे पुणे शहर मोदीचा स्वागत #GoBackModiने करत आहे,'' असे टि्वट पटोलेंनी केलं आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसने (ncp)उपहासात्मक फलक लावून मोदींच्या दैाऱ्याची खिल्ली उडवली आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेसने (ncp)उपहासात्मक फलक लावून मोदींच्या दैाऱ्याची खिल्ली उडवली आहे. ''मोदीजी आले, मोदीजी आले, अरे हो इलेक्शन आले..'' अशा आशयाच्या फलक राष्ट्रवादी काँग्रेसने लावले आहे. महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा पुणे दैारा असल्याचे नकळत राष्ट्रवादीने या फलकाच्या माध्यमातून सांगितले आहे. समाज माध्यमांवर या फलकाची चर्चा रंगली आहे.
नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यात, महापालिकेच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे ते अनावरण करणार आहेत. या दौऱ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहभागी होणार आहेत. पुणे शहर राष्ट्रवादी कॉग्रेस मात्र मोदींच्या दौऱ्याच्या विरोधात आंदोलन करणार असून त्यांना काळे झेंडे दाखविणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या आजारपणामुळे अद्याप लांबच्या प्रवासाची मान्यता मिळाली नसल्याने ते उपस्थित राहणार नसल्याचं समोर येतं आहे. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का याबद्दल चर्चांना उधाण आलं होतं. परंतू उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला हजेरी लावणार नसल्यामुळे यावरील चर्चा आता थांबली आहे.
पुण्यात मेट्रो कुणामुळे आली, यावरुन सध्या राजकारण तापलं आहे. भाजप आणि कॉग्रेस यांच्यात श्रेयावरुन लढाई सुरु आहे. ''पुण्यात मेट्रो रेल्वे आणण्याचे मोठे श्रेय काँग्रेस पक्षाचे आहे, हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे आणि मेट्रोचा पाठपुरावा करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मेट्रोच्या उद्धघाटन सोहळ्याचे निमंत्रण का नाही ? असा काँग्रेसचा सवाल असून भाजपने कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi)यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.