Supriya Sule - Balasaheb Thorat - Sharad Pawar - Rohit Pawar
Supriya Sule - Balasaheb Thorat - Sharad Pawar - Rohit Pawar 
पुणे

विरोधी बाकांवरच बसण्याचे शरद पवारांचे सूतोवाच

मिलिंद संगई

बारामती शहर : राज्यातील जनतेने आम्ही विरोधात बसावे असाच कौल दिलेला आहे, त्यामुळे वेगळ्या प्रस्तावावर चर्चा करण्यात अर्थ नाही. या पुढील काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हातात हात घालून काम करेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येथे सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज बारामतीत गोविंद बागेत शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार व बाळासाहेब थोरात माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान बाळासाहेब थोरात यांनीही ही दिवाळीच्या निमित्ताने सदिच्छा भेट आहे, आम्ही शिवसेनेला कुठलाही प्रस्ताव दिला नाही किंवा शिवसेनेनेही आम्हाला प्रस्ताव दिला तर त्यासंदर्भात आम्ही दिल्लीशी चर्चा करुन याबाबतचा निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. मात्र, शिवसेनेकडून देखील आम्हाला कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.  

शरद पवार यांनीही यावेळी सत्ता स्थापन करणे किंवा तिसरा पर्याय निर्माण करणे याचा प्रश्नच निर्माण होत नाही असे सांगत जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलेला आहे तो मी स्वीकारलेला आहे, मात्र भविष्यात जनतेच्या प्रश्नावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हातात हात घालून काम करेल असा विश्वास व्यक्त केला.दरम्यान विरोधी पक्षनेतेपदाचा संदर्भात देखील काही चर्चा झालेली नाही, दिवाळीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र बसून सर्वच विषयांवर निर्णय घेईल असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

दरम्यान 30 तारखेला दुपारी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलावली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.खासदार सुप्रिया सुळे व नवनिर्वाचित आमदार रोहित पवार हेही या वेळी उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT