Arvind Shinde Sarkarnama
पुणे

Pune Congress: लावा ताकद! काँग्रेसची 'एकला चलो रे' ची भूमिका?

Congress preparing for 8 seat Assembly Election In Pune Arvind Shinde: पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. पाच ऑगस्टपर्यंत हे अर्ज करता येणार आहेत. हे अर्ज वरिष्ठांकडे सोपवण्यात येणार आहेत.

Sudesh Mitkar

Pune News : राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.

काँग्रेसने (Congress) महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागांवर तयारी करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील (Pune)आठही जागांवर तयारी करण्याच्या सूचना काँग्रेसच्या वरिष्ठांनी दिल्या असून या मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित सामोरे जाणार असल्याचं वारंवार आघाडीतील तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते सांगत आहेत. मात्र असं असलं तरी काँग्रेसने राज्यातील 288 जागांवर निवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात केली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस ठरला. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या महत्त्वकांक्षा बळावली आहे. जागा वाटपामध्ये अपेक्षित अशा जागा काँग्रेसला न सुटल्यास आणि ऐनवेळी 'एकला चलो रे'ची भूमिका घ्यावी लागल्यास सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये आपली तयारी असावी या दृष्टिकोनातून सर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून चाचपणी करण्यात येत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

पुणे शहरातील आठ विधानसभा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने सहा जागांवर आपला दावा सांगितला आहे. शिवसेना ठाकरे गटाने देखील सहा जागांवर महाविकास आघाडीकडून विधानसभा लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. यामध्ये काँग्रेसकडून अद्याप तरी अधिकृत जागांबाबत कोणतीही जाहीर वाच्यता करण्यात आली नसली तरी थेट आठ ही विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकी वेळी देखील काँग्रेसकडून अशाच प्रकारे इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यावेळी तब्बल 20 इच्छुकांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. याच अर्जातून रवींद्र धंगेकर यांची निवड करून काँग्रेसने उमेदवारी घोषित केली होती.

काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिलेला माहितीनुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार कसबा, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर, वडगाव शेरी आणि खडकवासला या विधानसभा मतदार संघामधून इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पाच ऑगस्टपर्यंत हे अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर हे इच्छुकांचे अर्ज वरिष्ठांकडे सोपवण्यात येतील.

एकीकडे महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार असल्याचे त्यांचे नेते सांगत असले तरी दुसरीकडे सर्वात आधी पुण्यातून इच्छुकांची अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे काँग्रेस कुठेतरी भविष्यात 'एकला चलो रे' ची भूमिका घेऊ शकता का अशा शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT