Congress protested
Congress protested sarkarnama
पुणे

पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोचे उदघाटन पुण्यात : काँग्रेसचे आंदोलन मात्र, पिंपरीत

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : 32 पैकी फक्त 12 किलोमीटरच्या अर्धवट मेट्रोमार्गाचे पालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे पुण्यात उदघाटन करीत असल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक दिवस अगोदर खोचक टीका केली होती. याच मुद्यावरून कॉंग्रेसनेही (congress) मोदींचा आज मेट्रोच्या उदघाटनानंतर निषेध केला. कडक बंदोबस्त व परवानगी अभावी कॉंग्रेसने पुण्याऐवजी पिंपरी (Pimpri-Chinchwad) मेट्रो स्थानकात निषेध आंदोलनपण, केले.

महाराष्ट्रामुळे कोरोना देशभर पसरला हे मोदींचे संसदेतील अवमानकारक विधान आणि त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे छत्रपती शिवरायांविषयींच्या आक्षेपार्ह वक्तव्याची किनार आजच्या कॉंग्रेस आंदोलनाला होती. मेट्रोचे काम अर्धवट असताना निव्वळ निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन भाजपने श्रेय लाटण्यासाठी उद्‌घाटनाची घाई केली. त्यामुळे त्यांचा निषेध करीत असल्याचे पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.

काळे झेंडे दाखवून त्यांनी व इतरांनी निषेध व्यक्त केला. माजी नगरसेवक मारुती भापकर तसेच माऊली मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विजय ओव्हाळ, सतिश भोसले, सौरभ शिंदे, किरण खाजेकर, अर्जुन लांडगे, सुधाकर कुंभार, सुभाष भंडारे, रवी यादव, तेजस पाटील, शरद कांबळे, सचिन सोनटक्के, अविनाश कांबळे, अमर पांडे, संतोष नांगरे आदींनी या आंदोलनात भाग घेतला.

पुणे-पिंपरी मेट्रो हे कॉंग्रेसचे नियोजन आहे. असा दावा करीत निव्वळ श्रेय लाटून, प्रसिध्दी मिळविण्यासाठी आणि काम अर्धवट असतानाही पंतप्रधानांच्या हस्ते भाजप त्याचे उद्‌घाटन करीत आहे, असे डॉ. कदम म्हणाले. पुणे, पिंपरीमध्ये मेट्रो सेवा सुरु करण्याचे स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांचे नियोजन होते. पुढे त्याला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी चालना दिली. पीएमआरडीए स्थापनेनंतरच्या पहिल्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री अजित पवार आणि कलमाडी यांनी या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा केला, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT